उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सागर बंगल्याकडे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे…
राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यावरील समर्थक व कार्यकर्ते यांचा थवा सागर बंगल्यावर गोरज मुहूर्तावर चर्चेसाठी येत आहे…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक उत्तमराव जानकर यांनी गेल्या आठवड्यामध्ये भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची मुंबई येथील सागर बंगला येथे भेट घेतलेली होती. त्यावेळेस दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा होऊन भविष्यातील राजकारणाच्या दिशेविषयी सखोल चर्चा झालेली होती. त्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपणांस निर्णय कळवतो, अशा पद्धतीने सांगितलेले होते. त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यावरील समर्थक व कार्यकर्ते यांचा थवा सागर बंगल्यावर गोरज मुहूर्तावर चर्चेसाठी येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सागर बंगल्याकडे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये उत्तमराव जानकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतून संघर्षमय राजकीय प्रवास केलेला आहे. गेली ४० वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असून त्यांनी माळशिरस तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात प्रस्थापित मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये राजकारण केलेले आहे. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधी गटाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याचे काम उत्तमराव जानकर यांनी केलेला आहे. उत्तमराव जानकर यांच्या विचाराचे नेते, कार्यकर्ते व मतदार आहेत. अनेकांची इच्छा आहे उत्तमराव जानकर आमदार व्हावेत. दोन वेळेला निवडणुकीमध्ये निसटता पराभव झालेला होता. त्याचे शल्य कार्यकर्त्यांना आज सुद्धा आहे. गेल्या लोकसभेच्या वेळेला विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत राहून माळशिरस तालुक्यातून एक लाखापेक्षा मताधिक्य देण्यामध्ये उत्तमराव जानकर व समर्थक यांचा सिंहाचा वाटा होता. भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अचानक आमदार राम सातपुते यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर उत्तमराव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढविलेली होती. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि उत्तमराव जानकर यांची राजकारणापलीकडची मैत्री आजसुद्धा आहे.
सध्या माळशिरस तालुक्यामध्ये राजकारणाची दिशा बदललेली आहे. भाजपमध्ये असणारे मोहिते पाटील परिवार लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने इतर पक्षात बंड करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गट एकत्र येणार, अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा माळशिरस तालुक्यात सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाने फसवले आहे, असा कार्यकर्त्यांचा सूर होता. राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी सागर बंगला येथे देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा विचार घेऊन निर्णय कळवितो असे सांगितलेले होते. यावेळी कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. उत्तमराव जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील गावांमध्ये जाऊन स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्याशी सुसंवाद साधलेला आहे. खऱ्या अर्थाने निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. अभी नही, तो कभी नही, अशी परिस्थिती माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व समर्थक मंडळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सागर बंगल्यावर सायंकाळी गोरज मुहूर्तावर चर्चेसाठी गेलेले आहेत. आजपर्यंत भारतीय जनता पक्षाकडून कशा पद्धतीने फसवणूक झालेली आहे, याचा पाढा वाचला जाणार आहे. भविष्यामध्ये राजकारणाची कोणती दिशा असणार आहे, यावर सखोल चर्चा होणार आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष सागर बंगल्याकडे लागलेले आहे. आज सायंकाळी नेते व कार्यकर्त्यांचा थवा गोरज मुहूर्तावर चर्चेसाठी पोहोचणार आहेत. सदरच्या शिष्ट मंडळामध्ये माळशिरस तालुक्याच्या मोहिते पाटील विरोधी राजकारणामध्ये सक्रिय असणारी गाभ्याची मंडळी मुंबईकडे रवाना झालेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
What a fantastic read! The humor made it even better. For further details, check out: READ MORE. Any thoughts?
Great article! The clarity and depth of your explanation are commendable. For additional insights, visit: LEARN MORE. Looking forward to the community’s thoughts!