उत्कृष्ट प्रशासक, कुशल रणनीतीकार तसेच केलेल्या नियोजनाची अचूकपणे अंमलबजावणी करणारे युवा नेतृत्व पार्थदादा पवार

अकलूज (बारामती झटका)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पडद्यामागून संपूर्ण संघटनात्मक जबाबदारी पार्थदादांनी आपल्या खांद्यावर घेतली. महाराष्ट्र तसेच देशातील केंद्रीय राजकारणात अजितदादांच्या पाठीशी ठाम राहून दादांच्या खांद्यावरील कामाचे ओझे कमी करण्याचे काम पार्थदादांनी वेळोवेळी केले. ज्याप्रमाणे अजितदादांनी आजवर कधी कामाची जाहिरात केली नाही, त्याचप्रकारे पार्थदादा देखील जाहिरातबाजी न करता काम करत आहेत.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे तसेच विरोधकांना मिळालेल्या सहानुभूतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपयश आले. लोकसभेच्या निकालानंतर पराभव विसरून दोनच दिवसात विधानसभा निवडणुकीचे नियोजन करणारे पार्थदादा आम्ही पाहिले.
लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सर्व स्तरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत फारसं कुणी चांगलं बोलत नव्हते या पक्षाचं काय खरं नाही, विधानसभेला पाच ते दहा जागा येतील, असा सर्वे होता. परंतु, या सर्वेला छेद देण्याचं काम पार्थदादांच्या संकल्पनेतूनच झालं.
अजितदादांनी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवणे यासाठी डिझाईन बॉक्ससारख्या एजन्सीला हाताशी धरून कॅम्पेन राबवणे ही संकल्पना पार्थदादांचीच. फक्त संकल्पना नाही तर त्याचे योग्य नियोजन करून सर्वसामान्य जनतेपर्यंत अजितदादांनी घेतलेले निर्णय पोहचवले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सन्मानाची आपुलकीची भावना निर्माण करण्यात आणि त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्यात यश देखील मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीला सोशल मिडिया कॅम्पेनची जोड मिळाली. त्याचा परिणाम विधानसभेच्या निकालात दिसून आला. पाच दहा जागा येणारे सर्वे बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 41 जागा निवडून आल्या. या विजयात मोलाचा वाटा पार्थदादांचा देखील आहे.
नियोजन करणारे खूप नेते असतात परंतु, केलेल्या नियोजनाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा गुण हीच पार्थदादांची जमेची बाजू आहे.
अजितदादा सबंध महाराष्ट्रात सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यस्त असल्याने त्यांना बारामतीसाठी वेळ देता येत नव्हता पण, बारामतीची धुरा पार्थदादांनी उत्तमरीत्या संभाळली. योग्य नियोजन आणि रणनीतीच्या साहाय्याने तसेच सुनेत्रा वहिनीसाहेब, जयदादा व कार्यकर्त्यांच्या सोबतीने संपूर्ण कुटुंब विरोधात असताना देखील बारामतीचा विजय खेचून आणला. अजितदादांना निवडणूक काळात बारामती मध्येच अडकून ठेवायचं हे विरोधकांचे षडयंत्र देखील पार्थदादांच्या योग्य रणनीतीने, नियोजनाने धुळीस मिळाले.
अजितदादांनीच राजकारणात आणलेली मोठी केलेली माणसं जेव्हा अजितदादांवर टोकाची खालच्या स्तरावरील भाषेत टीका करत होती. तेव्हा देखील शांतपणे, संयमीपणे कुणाला काय उत्तर द्यायचं तसेच सोशल मिडियामध्ये प्रचार करत असताना कोणते मुद्दे अधोरेखित करायचे, याचं नियोजन सुद्धा पार्थ दादांनी उत्तमरीत्या केले.
वडील पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तरीसुद्धा कोणत्याही सत्तेचा, संघटनात्मक पदाचा मोह न ठेवता पार्थदादा सदैव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. हा मनाचा मोठेपणा फक्त पार्थदादाच करू शकतात.
जनतेची काम करणे हे ध्येय असणाऱ्या पार्थदादांसारख्या दूरदृष्टीच्या कुशल रणनीतीकार आणि नियोजनकार युवा नेतृत्वाची गरज आज महाराष्ट्राला आहे. नव महाराष्ट्राचे नव युवा नेतृत्व पार्थदादा यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा…
श्री. आनंद शरद पवार
महाराष्ट्र राज्य प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.