वटपळी येथे ह. भ. प. प्रा. अमोल सूळ महाराज, मोरोची यांचे सुश्राव्य कीर्तन होणार…

कै. संपतराव बाळासाहेब वगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन
वटपळी (बारामती झटका)
वटपळी ता. माळशिरस, येथे कै. संपतराव बाळासाहेब वगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण (वर्ष श्राध्द) निमित्ताने शनिवार दि. ०६/०१/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत ह. भ. प. प्रा. अमोल सुळ महाराज, मोरोची यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन वटपळी, अकलूज-माळशिरस रोड, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी ह. भ. प. प्रा. अमोल सूळ महाराज मोरोची यांना ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था, मोरोची, बागेवाडी, गिरझणी, कोंडबावी यांची साथ असणार आहे.
सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि वटपळी, कोंडबावी येथील सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. जोतीराम संपतराव वगरे, श्री. हनुमंत संपतराव वगरे आणि सौ. छायाताई तुकाराम हाके यांच्या वतीने करण्यात आले आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.