ताज्या बातम्यासामाजिक

वेळापूर येथे उभ्या असलेल्या चार चाकी गाडीची काच फोडून डिकीतील 50 हजार अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

वेळापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तपासाची चक्रे गतिमान केल्याने चोरांचे फुटेज हाती लागले.

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर ता. माळशिरस येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चौकातील हॉटेल आरजे रेस्टॉरंट समोरील उभ्या असलेल्या चार चाकी गाडीची काच फोडून समोरील डिक्कीमध्ये असणारे एक लाख रुपये व पासबुक यामधील पासबुक वरील पन्नास हजार व पासबुक घेऊन गेले. पासबुक खालील पन्नास हजार रुपये तसेच राहिलेले आहेत. याबाबत फिर्यादी महादेव बाबासाहेब कट्टे (वय 63) सेवानिवृत्त कृषी अधिकारी, रा. कट्टे पाटील वस्ती, वेळापूर, ता. माळशिरस, यांनी वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 301/2023 भा.द.वि. क्रमांक 379 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक 1579 पाटील हे करीत आहेत. वेळापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तपासाची चक्रे गतीमान केल्याने चोरांचे फुटेज हाती लागलेले आहेत. लवकरच आरोपी जेरबंद होण्याची शक्यता आहे.

हकीगत अशी की, शनिवार दि. 04/11/2023 रोजी 03.15 वाजता फिर्यादी महादेव बाबासाहेब कट्टे स्वतःची हुंदाई कंपनीची अल्काझर कार MH 13 DT 3055 वेळापूर चौकात मळोली रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी करून हॉटेल आर जे रेस्टॉरंट मध्ये गेलेले होते. दरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीच्या डिकीमध्ये ठेवलेले एक लाख रुपये व पासबुक पैकी 50 हजार रुपयाचा एक बंडल व पासबुक गाडीच्या डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहे. याबाबत वेळापूर पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार पोलीस नाईक 07 पवार यांनी तक्रार दाखल करून घेतलेली आहे.

वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांनी तपासाची चक्रे गतिमान केलेली असून सदरच्या अज्ञात चोरांचे फुटेज हस्तगत करून गोपनीय खबऱ्या मार्फत सदर इसमांची माहिती मिळवून लवकरच अज्ञात चोरटे जेरबंद होण्याची शक्यता आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button