पुरंदावडे ग्रामपंचायतीला माऊलींच्या रिंगण सोहळ्याचा निधी कुठे खर्च करावा ? असा प्रश्न असणार आहे…
जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पहिल्या रिंगण सोहळ्याचे पुरंदावडे गावच्या हद्दीतील मैदान उत्कृष्ट तयार केलेले आहे…
सदाशिवनगर (बारामती झटका)
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळ्यातील माळशिरस तालुक्यात माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे सदाशिवनगर येथे होत असते. लाखो भावी रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित असतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग विस्तारीकरणाचे काम जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने केलेले आहे. विस्तारीकरणाचे काम सुरू असताना माऊलींच्या पहिल्या रिंगण सोहळ्याचे पुरंदावडे गावच्या हद्दीतील रिंगण सोहळ्याचे मैदान मुरूम भरून मोठ्या रोलरने उत्कृष्ट मैदान तयार केलेले आहे. त्यामुळे यंदाच्या पुरंदावडे ग्रामपंचायतीला माऊलीच्या रिंगण सोहळ्याचा निधी कुठे खर्च करावा असा प्रश्न असणार आहे.
जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने रिंगण सोहळ्याचे मैदान कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे तयार करून खऱ्या अर्थाने माऊलींची निस्वार्थीपणे सेवा केलेली आहे. अतिशय दर्जेदार व मजबूत मैदान तयार केलेले आहे. सध्या त्या मैदानावर थोडीफार काटेरी झुडपे काढून ट्रॅक्टरने फिरवून रिंगण तयार केलेले आहे.
रिंगण सोहळ्यासाठी लाखो रुपये शासनाचे येत असतात. ग्रामपंचायत आलेला निधी कुठे खर्च करणार, असाही प्रश्न ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य व स्थानिक नागरिक यांच्यामधून उपस्थित केला जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
My brother suggested I might like this website He was totally right This post actually made my day You cannt imagine just how much time I had spent for this information Thanks
Thanks for the postReally thank you! Want more
Great postReally thank you! Really Cool