विझोरी येथे मतदान जागृतीचे अभियान…
विझोरी (बारामती झटका)
विझोरी ता. माळशिरस येथे मतदान जन-जागृती अभियान मंगळवारी आयोजित केले होते. मंडल अधिकारी श्री. एस. ए. भोसले, श्री. एस. एस. घाडगे यांच्या उपस्थितीत सदरचे अभियान पार पडले.
मतदार जागृती आणि मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग कार्यक्रम विझोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर, विझोरी येथे पार पडला. लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात नव्याने मतदार नोंदणी आणि मतदान जन-जागृतीचे काम महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत. लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा अधिकार न चुकता बजवावा व लोकशाही बळकट करावी, यासाठी मंडलाधिकारी भोसले यांनी अहवान केले.
“मतदार राजा जागा हो” “लोकशाहीचा धागा हो”, “मतदान करा व लोकशाहीचे हात बळकट करा”. यावेळी ग्रामसेवक जी. ए. लांडगे, श्री. जे. एस. वाघंबरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक डॉ. सचिन शेंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष आंदोलनवीर अजित बोरकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोरवे (सर), श्री. राजगुरू (सर) व गावातील मतदार उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
This was such an interesting read! I chuckled a few times. For more laughs and insights, visit: DISCOVER HERE. Anyone else have thoughts on this?