ताज्या बातम्या

वरमाईच शिंदळ तर वर्हाडाचं काय, अशी अवस्था माळशिरस वनविभाग कार्यालयाची झाली आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या ठिकाणी वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. सुसज्ज असे शासकीय कार्यालय बांधलेले आहे. परंतु, अधिकाऱ्यांचा पत्ताच नसतो. मीटिंगचे कारण सांगितले जाते. तीनवेळा जाऊनसुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी भेटत नाहीत, त्यांचा संपर्क होत नाही. कार्यालयांमध्ये उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे, वरमाईच शिंदळ असेल तर वर्हाडाचं काय अशी, अवस्था वनपरिक्षेत्र कार्यालयाची झालेली आहे.

माळशिरस तालुक्यात वन विभागाचे जास्त क्षेत्र आहे. सदरच्या क्षेत्रावर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे, याकडे वन विभागाचे लक्ष नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते कारण, अर्थपूर्ण संबंध असल्याने अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असतात. दरवर्षी वन विभागाच्या हद्दीमध्ये रोपांची लागवड केली जाते. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नर्सरी उभा केल्या जातात. त्या ठिकाणी रोपांची निर्मिती केली जाते. त्यावर लाखो रुपये खर्च केला जातो. ठराविक मजूर कामावर ठेवले जातात. त्यांना हजेरीपटावरील मोबदला वेगळा व प्रत्यक्ष हातामध्ये वेगळा दिला जातो.

अनेक ठिकाणी वन विभागामध्ये कामे सुरू आहेत. सदरची कामे अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू आहेत. अंदाजपत्रकाप्रमाणे कामे नाहीत, अशी अनेक कार्यालयांमध्ये गोलमाल सुरू आहेत. सदरच्या कामांविषयी व नर्सरीविषयी माहिती संकलित करण्याकरता अनेक वेळा हेलपाटे मारूनसुद्धा अधिकारी भेटत नाहीत. कायम मीटिंग असते, वनपरिक्षेत्र अधिकारी यांची बदली झालेली होती. त्यांनी मॅटमध्ये जाऊन पुन्हा माळशिरस येथे कार्यरत झालेले आहेत. कागदोपत्री कार्यरत आहेत मात्र, प्रत्यक्ष भेटत नाहीत. मॅटमध्ये जाऊन माळशिरस तालुक्याला उपयोग काय, असाही सवाल उपस्थित केला जातोय. स्वतःच्या फायद्यासाठी केला की वन विभागाच्या हितासाठी केला, याचा हिशोब आजपर्यंत केलेल्या कारकिर्दीमधील केलेल्या कामाचा हिशोब पाहिल्यानंतर निश्चितपणे कळणार आहे.

लवकरच वन विभागाचे स्टिंग ऑपरेशन अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या भेटीनंतर सुरू होणार आहे. वन विभागाच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर व अंदाजपत्रकानुसार कामे न झालेली आपल्या परिसरामध्ये घटना असतील तर आपण संपादक श्रीनिवास कदम पाटील 98 50 10 49 14 या नंबरवर संपर्क साधावा अथवा व्हाट्सअप वर फोटो व्हिडिओ पाठवावे. खऱ्या अर्थाने वन विभागाचा चेहरा जनतेसमोर बुरखा फाडून आणता येईल. यासाठी जनतेचा सुद्धा सहभाग हवा, अशी आपणाला विनंती आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. I found this article to be both engaging and enlightening. The points made were compelling and well-supported. Let’s talk more about this. Click on my nickname for more engaging content!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort