यश टोणपे याने मुंबई पोलीस भरती परीक्षेत यश संपादन करून मिळविला चौथा क्रमांक
पुणे (बारामती झटका)
मोटार मेकॅनिकचा व्यवसाय असलेले मु. पो. शिराळ माढा गावचे श्री. अशोक टोणपे यांचा मुलगा कु. यश अशोक टोणपे याने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर मुंबई पोलीस भरती परीक्षेमध्ये १३२ मार्क मिळवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सद्या हडपसरमध्ये स्थायिक असून हडपसर परिसरात विद्यमान नगरसेवक श्री. उल्हास भाऊ तुपे यांनी कु. यश याचा नुकताच सत्कार केला आहे. यावेळी कु. यशचे वडील अशोक टोणपे यांनी मुलाने आपले नाव मोठे केले अशी भावना बोलून दाखविली. तसेच भविष्यामध्ये पुढील शिक्षण चालूच ठेऊन पोलीस निरीक्षक पदाची तयारी करणार असल्याचेही यश याने बोलून दाखविले.

कु. यश टोणपे याने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
