पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही महापूजेचे पास देण्यात यावे, शिवक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांची मागणी

पंढरपूर (बारामती झटका)
शिवक्रांती संघटनेच्यावतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांना निवेदन देण्यात आले. पंढरपूर शहरातील अनेक सामाजिक संघटना सामाजिक कार्य करत आहेत. शहरातील सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने महापूजेचे पास द्यावेत, अशा मागणीचे निवेदन मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुलंदवाड साहेब यांना देण्यात आली.
यावेळी निवेदन देताना शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे महाराज, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव शंकर सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर तात्या जगताप, सामाजिक संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर शहराध्यक्ष सनी भाऊ घुले आदी उपस्थित होते.
सदर निवेदनात, सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पास नाही दिले तर मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार, असे आव्हान पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनांनी दिले आहे. असेही शिवक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष यांनी म्हटले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.