वरळी येथील २७ व्या कॅप्टन एस. जे. इझिकल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये मेरी माथा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, म्हसवड च्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली…

म्हसवड (बारामती झटका)
महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांच्यावतीने वरळी, मुंबई येथे ६ ते १० जून या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या २७ व्या कॅप्टन एस. जे. इझिकल राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये आर्यमान शूटिंग स्पोर्ट्स क्लबचे प्रतिनिधित्व करून मेरी माथा हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, म्हसवडची खेळाडू कु. निर्जरा हनुमंत भोसले हिने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात जूनियर गटामध्ये तृतीय क्रमांक तर युथ गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवून सलग चौथ्या वर्षीही मुलींच्या पिस्तल प्रकारामध्ये आर्यमान शूटिंग क्लब, पिलीवच्या यशाची परंपरा कायम ठेवली. यामध्ये तिने 400 पैकी 363 गुण मिळवले.
तसेच रुद्र काटकर, अनुष्का मंगरुळे, जास्मिन मुल्ला, क्रांती मोरे या खेळाडूंनी एअर रायफल प्रकारात व पियुशा सानप, स्वरा कलढोणे या खेळाडूंनी एअर पिस्तूल प्रकारात पात्रता मिळवत पुढील कालावधीमध्ये होणाऱ्या वेस्ट झोन फ्री नॅशनल स्पर्धेकरिता पात्रता मिळवली. त्यांना त्यांच्या या यशामध्ये प्रशिक्षक आकाश गुजरे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या सचिव शीला कानंगो, अनिल रासकर सर, सद्गुरु साखर कारखान्याचे चेअरमन एन. शेषागिरीराव (अंकल), भाजपा युवामोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष शिवराजभैय्या पुकळे, विद्यालयाचे प्राचार्य फादर सानू तसेच सर्व पत्रकार मित्र यांनी अभिनंदन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.