ताज्या बातम्यामनोरंजन

युवा महोत्सवाच्या माध्यमातून उदयास आलेला कलाकार झाला मराठी चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक.

युवा महोत्सवातच केले मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन.

संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून

उन्मेष सृजन रंगाचा… सोलापूर युवा महोत्सव… म्हटलं की तरुण कलाकारांचा जल्लोष आणि उत्साह… कलाकारांची मांदियाळी… उदयमुख कलाकारांसाठी व्यासपीठ…!

याच युवा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कलाकार आपली कला सादर करत असतात आणि आपली स्वप्ने पूर्ण करत असतात. अशाच प्रकारे आपल्या सोलापूर युवा महोत्सवातून घडलेला अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातील एक तरुण कलाकार धीरज गुरव याने एका नवीन मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. “इंटरनॅशनल फालमफोक” या मराठी चित्रपटाचे त्याने दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

“इंटरनॅशनल फालमफोक” हा चित्रपट सामाजिक विषयांवर भाष्य करतो. या चित्रपटाचे पोस्टर युवा महोत्सवाच्या कला वारकरी मुख्य रंगमंचावर युवा महोत्सव समितीचे डॉ. केदारनाथ काळवणे, संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर विद्यार्थी कल्याण विभाग डॉ.अनिल साळवे नाट्यशास्त्र विभाग औरंगाबाद, युवा महोत्सव समिती सदस्य डॉ. विश्वनाथ आवड, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. यशपाल खेडकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सर्व चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. यावेळी चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक धीरज गुरव, निर्मिती व्यवस्थापक टीम अमित कांबळे, शशिकांत भोसले, अजिंक्य लाडे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button