Uncategorizedताज्या बातम्यासामाजिक

तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन दिवस अत्याचार…

अपहरण करून मंदिरात लावले बळजबरीने लग्न, करमाळा तालुक्यातील निंदनीय प्रकार…

पोलिसांनी आर्थिक तोडजोड करून आरोपींना संरक्षण अल्पवयीन मुलीच्या आईचा आरोप!!!

करमाळा (बारामती झटका)

करमाळा शहरात एका विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून डोमगाव येथील मंदिरात बळजबरीने विवाह केला. तर त्या दिवशी रात्री नेरले, ता‌. करमाळा, येथे संबंधित मुलाने तिच्यावर रात्रभर अत्याचार केला तर दुसऱ्या दिवशी तिला आपल्या मामाच्या घरी ढवळस, ता. माढा, येथे घेऊन गेला व तिथेही तिच्यावर रात्रभर अत्याचार केला.
आपले लग्न झाले आहे, असे सांगून याची कुठे वाच्यता केली तर तुझ्या भावाला जिवंत ठेवणार नाही, अशी दमदाटी करून संबंधित अल्पवयीन मुलीला भीती घातली.
आपली मुलगी घरी आली नाही, हे पाहून मुलीच्या आईने पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक करून पण मुलीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल न करता आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे.
मार्च 2023 मध्ये हा प्रकार घडला
या प्रकरणात बळजबरीने विवाह करून या अल्पवयीन मुलीवर दोन दिवस अत्याचार करण्यासाठी मदत करणारे
भागवत सुरवसे, विद्या सुरवसे, राणी सालगुडे, बालाजी गवळी, झुंबर विटुकडे, मनीषा इटूकडे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पीडित मुलीने केली आहे.

पीडित मुलीच्या आईने
याबाबत बोलताना सांगितले
मी, खडी क्रेशरवर कामाला जाऊन रोजंदारीने मजुरी करून जगते. माझे पती चार वर्षापासून बेपत्ता आहेत.
माझ्या तेरा वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न करून तिच्यासोबत दोन रात्र अत्याचार करणारी व या अत्याचाराला मदत करणार्या लोकांना शिक्षा झाली नाही झाली तर मी आत्महत्या करणार आहे.

महेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख
या प्रकरणात पोलिसांनी अक्षम्य चूक केली असून अशा संवेदनशील प्रकरणात पीडित मुलीला न्याय द्यायचे सोडून आरोपींना संरक्षण देण्याची भूमिका वेदनादायक आहे.
पीडित मुलीला शिवसेना दत्तक घेणार असून यापुढे पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे शिवसेनेने तक्रार केली असून आता चाकणकर कुठली भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे लागून राहिले आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी फरार आरोपींनाअटक करण्याची प्रक्रिया सुरू – ज्योतीराम गुंजवटे
एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने विवाह करून तिच्यावर दोन दिवस सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपी सोबत सहआरोपी असलेल्या लोकांना अटक करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली आहे. मार्च 2023 मध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेव्हापासून या प्रकरणातील चार आरोपी फरारी होते. फरारी असणारे हे आरोपी पीडित मुलगी व तिच्या आईला केस पाठीमागे घ्या म्हणून दमदाटी करीत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला होता.

पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून या फरारी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली आहे.

पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल आठ महिने पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबद्दल पीडित मुलीने शंका व्यक्त केली होती. – ॲड. शिरीष लोणकर प्रवक्ते शिवसेना करमाळा

पीडित मुलीचे पालकत्व शिवसेनेने घेतले असून
यातील मुख्य आरोपी सोबत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींवर सुद्धा पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करा, अशी शिवसेनेची मागणी असून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न लावून तिच्यावर बळजबरीने दोन दिवस अत्याचार करणे या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्वांना पोस्को लावणी गरजेचे आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort