ताज्या बातम्याराजकारण

गिरवीच्या सरपंच सोनाली सोमनाथ मदने यांच्यावरील अविश्वास ठराव निष्फळ ठरला.

माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी कालावधीच्या अधीन राहून प्रस्ताव रद्द करण्यात आला.

गिरवी (बारामती झटका)

गिरवी ता. माळशिरस, ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. सोनाली सोमनाथ मदने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव उपसरपंच राजू नारायण नरूटे यांनी माळशिरस तहसील कार्यालय येथे दि. २२/०२/२०२४ रोजी दाखल केलेला होता. त्या अनुषंगाने माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात २७ रोजी दुपारी १२ वा‌ ग्रामपंचायत कार्यालय गिरवी येथे सदस्यांची विशेष सभा अविश्वास ठरावावर आयोजित केलेली होती. गिरवी गावच्या विद्यमान सरपंच सोनाली सोमनाथ मदने यांची गिरवी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी दि. २९/०३/२०२२ रोजी निवड झालेली होती. अविश्वास ठराव दाखल करण्याकरता दोन वर्षाचा कालावधी पूर्ण व्हावा लागतो. सदरचा कालावधी पूर्ण झालेला नसल्याने तहसीलदार यांनी सभा रद्द करून सदरचा अविश्वास ठराव निष्फळ ठरवलेला आहे.

विद्यमान सरपंच सौ. सोनाली सोमनाथ मदने यांच्यावर अविश्वास ठराव तहसील कार्यालय येथे दाखल करीत असताना ग्रामपंचायतीचे सदस्य राजू नारायण नरूटे, अनिता अण्णा सरगर, तोलन बाळू शिंदे, सुरेखा संतोष राऊत, शालन गेना सावंत, निलाबाई ज्ञानदेव पिसे, कमल भानुदास सरगर, कांताबाई जयराम गोपने, कृष्णा विठोबा जाधव अशा सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असणारा अविश्वास ठराव तहसील कार्यालय येथे दाखल केलेला होता. सदरच्या ठरावावर काय होते, याकडे माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले होते.

सौ. सोनाली सोमनाथ मदने यांचा दोन वर्ष कालावधी पूर्ण झालेला नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ३५ मधील (३) उपकलम मधील तरतुदीनुसार सरपंच निवड झालेपासून दोन वर्षाच्या आत अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. गिरवी येथील सरपंच यांना निवड होऊन दोन वर्ष पूर्ण झालेली नाहीत. सदरची सभा रद्द करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी सर्वांना नोटीस देऊन सदरची सभा रद्द करण्यात आलेली आहे.

माळशिरस तालुक्याचे व गिरवी पंचक्रोशीचे लक्ष लागून राहिलेले सरपंच यांच्यावरील अविश्वास याकडे लक्ष लागलेले होते. तहसीलदार यांनी सदरची सभा रद्द करून अविश्वास प्रस्ताव रद्द केलेला असल्याने सोनाली सोमनाथ मदने यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort