अकलूजच्या डॉ.श्रीकांत देवडीकर यांचा वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान.
संग्रामनगर (बारामती झटका केदार लोहकरे यांजकडून)
भारतीय प्रजासत्ताकाचा 76 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव 15 ऑगस्ट 2023 रोजी सोलापूर येथे करण्यात आला असून, अकलूज येथील सुप्रसिद्ध किडनी विकार तज्ञ डॉ.श्रीकांत देवडीकर यांचा महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केलेबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
माळशिरस तालुक्यातील आधुनिक वैद्यकीय दुनियेतील चमकता तारा म्हणुन, डॉ. श्रीकांत देवडीकर यांच्याकडे पाहिले जाते.समस्त मानव जातीच्या निरोगी आयुष्यासाठी आहोरात्र संघर्ष करणारा सोलापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय विश्वातील विश्वसनीय व्यक्तिमत्त्व डॉ.श्रीकांत नंदकुमार देवडीकर यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातुन समाज कार्याची प्रेरणादायी मशाल तेवत ठेवली आहे.त्यांच्याकडे असलेल्या डायलिसीस विभागाच्या उत्तम सोयीमुळे लाखों रूग्णांना नवे जीवन मिळत आहे.
शांत स्वभाव,संयमी व्यक्तिमत्त्व,उत्कृष्ट विचारसरणी,प्रबळ इच्छाशक्तीच्या माध्यमातून जनआरोग्य अबाधित राहण्यासाठी प्रखर दाहकतेचा सामना करत तमाम रूग्णांना यमसदनातून बाहेर काढणारा दैवरुपी माणूस डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी लाखों रूग्णांना निसर्गाच्या विरोधात जात दुसरा जन्म देऊन वैद्यकीय रणांगण गाजविले आहे. म्हणूनच डॉ. श्रीकांत देवडीकर यांच्या कार्य कर्तुत्वाच कौतुक सर्वत्र होत आहे.
असीम शौर्य आणि धैर्य असणारे,वैद्यकीय क्षेत्रातील प्रचंड अनुभवी भगीरथ तर आलेल्या प्रत्येक रुग्णांसाठी तत्पर सेवा देणारे कै.डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या पावलावर पाऊल टाकत डॉ.श्रीकांत देवडीकर यांनी अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रभावी असाच गगनस्पर्शी मनोरा उभा करून आपल्या वडिलांच्या विचारांना नवी दिशा दिली आहे.ते करीत असलेल्या आहोंरात्र कार्यामुळे त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
