अकलूजमध्ये निमगाव मगराचे येथील सचिन मगर यांच्या चार चाकी गाडीची काच फोडून 02 लाख 83 हजार लंपास केले…
सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीची काच फोडून पैशाची बॅग लंपास करणाऱ्या अज्ञात चोर व त्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे फुटेज दिसत आहे.
अकलूज (बारामती झटका)
निमगाव मगराचे ता. माळशिरस येथील सचिन भारत मगर वय 31 व्यवसाय बि.सी. पॉईंट चालवणे यांचे अकलूज येथील बायपास रोड वरील डूडू सराफ यांच्या दुकानासमोर उभी केलेली स्विफ्ट कार नंबर एम एच 12 एफ एफ 0436 या चार चाकी वाहनाची साईडची काच फोडून अज्ञात इसमाने 02 लाख 83 हजार रोख रक्कम व दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल असे 02 लाख 93 हजार रुपये असणारा ऐवज व बॅगेमध्ये चेक बुक आधार कार्ड पॅन कार्ड व इतर कागदपत्रांसह अज्ञात चोरांनी लंपास केलेली आहे.
हकीगत अशी, सचिन भारत मगर हे निमगाव मगराचे गावात बँक ऑफ बडोदा शाखा वेळापूरचे वक्रांगी एटीएम चालवत आहेत. दि. 12/07/2023 रोजी दुपारी २.२४ च्या सुमारास निमगाव येथून स्विफ्ट गाडीने अकलूज येथील बँकेतून पैसे काढण्याकरता आलेले होते. बँक ऑफ बडोदा शाखा अकलूज येथे आल्यानंतर त्यांनी चेकने 02 लाख 57 हजार रुपये काढून बॅगेमध्ये ठेवलेले होते. सदरच्या बॅगेत मोबाईल व स्वतः जवळ असलेली 26 हजार रुपये रोख रक्कम, चेकबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे होती. सदर बॅग चार चाकी गाडी मधील ड्रायव्हर सीट जवळ ठेवलेली होती. कामानिमित्त मार्केट यार्ड येथे जाऊन आलेले होते. त्यानंतर बायपास रोडवर डूडू सराफ यांच्या शेजारी असणाऱ्या उमदा मोबाईल शाखेमध्ये कामानिमित्त गेलेले होते. दहाच मिनिटात परत आले तर त्यांना त्यांच्या गाडीची ड्रायव्हर साईटची काच फुटलेली दिसली जवळ जाऊन पाहिले तर ड्रायव्हर सीटजवळ ठेवलेली पैशाची बॅग दिसली नाही. आजूबाजूला शोध घेतला परंतु, बॅग सापडली नाही. अज्ञात इसमाने गाडीची ड्रायव्हर साईडची काच फोडून मुद्देमाल असणारी पैशाची बॅग चोरून नेलेली आहे. अकलूज पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंद केलेली आहे.
सदरच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अज्ञात चोर मोटरसायकल वरून आलेले दिसत आहेत. गाडीची काच फोडून पैशाची पिशवी घेत असताना सुद्धा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे. दोन मोटरसायकलवर चार अज्ञात चोर असण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अंदाज येत आहे. रहदारीचा रस्ता असताना अज्ञात चोरांनी काम फत्ते केलेले आहे. अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी पदाची सूत्रे दोनच दिवसापूर्वी कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक सई भोर पाटील यांनी घेतलेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड तपासाची चक्रे फिरवून लवकरच अज्ञात चोरांना जेरबंद करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng