Uncategorized

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभा आहे – श्रीनिवास कदम पाटील.

माळशिरस तालुक्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व विभूतींचा आशीर्वाद व मतदार मायबाप यांच्या सहकार्याने निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

माळशिरस (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून अपक्ष निवडणूक रिंगणात उभा आहे‌. तरी, सर्व मतदार मायबाप यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्या सहकार्यावरच निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी व विरोधी दोन गटांमध्ये निवडणूक असताना अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी उतरणार आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकारी संस्था मतदार संघात अकरा उमेदवार उभे आहेत. त्यामधील सभासदांना 11 मताचा अधिकार आहे. ग्रामपंचायत मतदार संघात चार उमेदवार उभे आहेत‌. त्यामधील सभासदांना चार मताचा अधिकार आहे. निवडणूक सत्ताधारी व विरोधी गटामध्ये जोरदार चुरस निर्माण होणार आहे. सर्व मतदार मायबाप यांना अपक्ष उमेदवार म्हणून विनंती आहे. आपले सहकारी सेवा सोसायटी मतदार संघातील दहा मते कोणालाही द्या, एक मत मला द्यावे व ग्रामपंचायत मतदार संघातील तीन मते कोणालाही द्या, अशी माझी आपणास विनंती आहे.

माळशिरस तालुक्याच्या जडणघडणीत अनेक लोकांनी तालुक्यात भागात व गावांमध्ये आपापल्या पद्धतीने सामाजिक, राजकीय कार्यात योगदान देऊन तालुक्याची परंपरा जपलेली आहे. त्यामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील शंकरनगर, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील अकलूज, धर्मवीर सदाशिवराव माने पाटील, व्यंकटराव माने पाटील बागेचीवाडी, माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील धवलनगर, उद्योग महर्षी उदयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार चांगोजीराव उर्फ आबासाहेब देशमुख, अकलूज शामरावभाऊ पाटील पानीव, हनुमंतराव डोळस दसुर, मोहनराव पाटील, विजयकुमार उर्फ बाबासाहेब पाटील बोरगाव, हरीसाहेब माने देशमुख, सूर्यकांतदादा माने देशमुख, हरिभाऊ मुंगुसकर पाटील, शिवदास जानकर वेळापूर, नारायणराव जाधव, ॲड. जयसिंगराव जाधव मळोली, रामरावदादा पाटील पानीव, सुखदेवराव शिंदे, नामदेवराव पवार, तुकारामअण्णा कदम पाटील, एकनाथ मिले तांदुळवाडी, तुकाराम अवताडे फळवणी, अजितसिंह जहागीरदार पिलीव, श्रीनिवास राखले अकलूज, शिवदास कुंभार यशवंतनगर, शिवाजी साठे, पंढरीशेठ दाते, साहेबराव बाबा वाघमोडे, जवाहरलाल गांधी फोंडशिरस , प्रतापराव पवार, हनुमंतराव शिंदे शेंडेचिंच, महाम्मदभाई पठाण, ताहिरखान पठाण, हरिभाऊ कपणे, धोंडीबा पाटील, जयवंत बगाडे सर पिलीव, विष्णुपंत कुलकर्णी, बापूनाना देशमुख, बाजीराव देशमुख, बाळासाहेब पाटील, बापूनाना सिद, सिताराम आण्णा वाघमोडे, दामजीबापू वाघमोडे, शिवाजीराव पाटील, शामदत्त पाटील, शिवाजीराव काळे, भिमातात्या सावंत माळशिरस, ज्ञानेश्वर सालगुडे पाटील सदाशिवनगर, माणिकबापू कर्णवर पाटील, निवृत्ती गोरड, नानासाहेब कर्णवर पाटील गोरडवाडी, शिवाजीराव वाघमोडे चाकोरे, नानासाहेब देशमुख नातेपुते, माणिकराव पाटील, भगवान बाबासाहेब पाटील कण्हेर, आबासाहेब देशमुख, पोपटराव पाटील इस्लामपूर, आण्णासाहेब पांडुरंग रणनवरे, शंकरराव रणवरे, इनामदार माणकी, ढाकू सिद भांब, बजरंग काळे रेडे, गणपत कुलकर्णी गिरवी, हरिभाऊ गिरमे माळीनगर, दिनकरराव निंबाळकर, रावसाहेब निंबाळकर, सवत गव्हाण, पका पाटील माळीनगर, लालासाहेब इनामदार, तानाजी कोळेकर तांबवे, शंकरराव शेंडगे, तुकाराम सोलनकर, गणेशगाव शिवाजीराव महाडिक, माणिकराव ताटे देशमुख संगम, बलभीम शेंडगे, दत्तात्रेय माने शेंडगे, चांगदेव शेंडगे वाघोली, विजयकुमार पाटील, गोपाळराव वाघ लवंग, कुंडलिक रेडे पाटील, सुदाम मुंडफणे महाळुंग, विलास शिंदे पाटील, मधुकर भोरे बिजवडी, दत्ताआपा वाघमारे बागेचीवाडी, नानासाहेब मगर, कृष्णराव पाटील, प्रभाकर मगर पाटील, कृष्णात मगर निमगाव मगराचे, धुळाआण्णा ठवरे, देवबा ठवरे, विठोबा ठवरे खुडूस, तात्यासाहेब उर्फ टी. एम. काले अकलूज, सुभान चिलू साळवे नातेपुते, साहेबराव लवटे पाटील, ॲड. झंजे मेडद, रामचंद्र वाघमोडे, शंकर ठोंबरे उंबरे दहिगाव, नबिलाल मुंडे फोंडशिरस, हनुमंतराव पाटील, रघुनाथ उराडे, रामचंद्र भांड, सुरेशदादा ठोंबरे, दादा पाडसे, भीमराव पांढरे नातेपुते, मोतीलाल व्होरा अकलूज, बबननाना कोरडकर तात्याबा पाटील रेडे, संभाजी बरवे, लक्ष्मण शिंदे सरगरवाडी, माणिक मेटकरी बांगर्डे, हिराबाई पाटील, बाबासाहेब पाटील कळंबोली, साहेबराव जाधव जाधववाडी, शहाजीदादा मगर गारवाड, नारायणतात्या शिंदे, धैर्यशीलबापू शिंदे शिंदेवाडी, यादव अण्णा पाटील धर्मपुरी, छगन माने, देवबा सूळ पाटील मोरोची, नारायण माने कोथळे, अशा थोर विभूतींसह ज्ञात अज्ञात लोकांच्या विचाराचा वारसा जपण्यासाठी निवडणुकीत उभा आहे.

तरी वरील सर्व विभूतींचे नातेवाईक, मित्रपरिवार, नेते व कार्यकर्ते यांनी एक मत देऊन अपक्ष उमेदवार यांना पाठबळ द्यावे आणि सत्ताधारी व विरोधक अटीतटीच्या निवडणुकीत राजकीय इतिहास निर्माण करावा, अशी आपणास विनंती आहे . दि. 20/04/2023 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. अनेक मतदार मायबाप यांनी हस्ते पर हस्ते प्रत्यक्ष भेटून मतदान देण्याचे मान्य केलेले आहे. त्यामुळे मला लढण्यास बळ मिळालेले आहे. माझे चिन्ह हॅट (टोपी) आहे. स्वर्गीय सौ. वेणूबाई व स्वर्गीय श्री. शिवाजीराव कदम पाटील यांचा मातृ-पितृ देवो भव या उक्तीप्रमाणे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे पाठबळ घेऊन अकलूजचे ग्रामदैवत अकलाई मातेस श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्याचा मानस आहे. तरी मतदार मायबाप यांच्या आशीर्वादाची गरज आहे. मतदान रुपी आशीर्वाद द्याल, असा माझा विश्वास झालेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button