अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची शासकीय यंत्रणा सज्ज…
अकलूज, महाळुंग, पिलीव, माळशिरस, नातेपुते पाच मतदान केंद्रावर तालुक्यातील गावांचा समावेश….
अकलूज (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती ता. माळशिरस या बाजार समितीच्या १८ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. बाजार समितीमध्ये एकूण ३५८७ एवढे मतदार आहेत. त्यापैकी सोसायटी मतदार संघात १८२२ मतदार, ग्रामपंचायत मतदार संघात ११५१, व्यापारी मतदार संघात ४११, हमाल तोलार मतदारसंघात २०३ असे मतदार आहेत. बाजार समितीच्या मतदारांना मतदान करण्याकरिता अकलूज, महाळुंग, पिलीव, माळशिरस, नातेपुते अशा गावांमध्ये मतदान केंद्राचे नियोजन केलेले आहे. प्रत्येक केंद्रावर सहकारी संस्था व ग्रामपंचायत दोन वेगवेगळ्या खोल्या आहेत. बाजार समितीच्या व्यापारी मतदार संघ व हमाल, तोलार, व्यापारी संघातील माळशिरस तालुक्यातील सर्व मतदारांसाठी अकलूज येथे सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथेच मतदान करण्यासाठी यावे लागणार आहे.
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालय येथे आनंदनगर, उघडेवाडी, कोंडबावी, खंडाळी, गिरझणी, चाकोरे, चौंडेश्वरवाडी, तांबवे, पानीव, पिसेवाडी, धानोरे, बागेची वाडी, बिजवडी, माळीनगर, यशवंतनगर, विझोरी, विजयवाडी, वेळापूर, संग्रामनगर, सवतगव्हाण, गणेशगाव, संगम, अकलूज या गावांचा होणार आहे.
माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशाला येथे इस्लामपूर, कन्हेर, उंबरे दहिगाव, कचरेवाडी, गिरवी, गोरडवाडी, जळभावी, जाधववाडी, तरंगफळ, तामशीदवाडी, तिरवंडी, पुरंदावडे, भांब, भांबुर्डी, मेडद, मांडकी, मांडवे, मोठेवाडी (मा.), येळीव, रेडे, सदाशिवनगर, मारकडवाडी, माळशिरस या गावांचा समावेश आहे.
नातेपुते येथील डॉ. बाळकृष्ण दाते प्रशाला, नातेपुते येथे एकशिव, कदमवाडी, कळंबोली, कारंडे, कुरबावी, कोथळे, गुरसाळे, फडतरी, डोंबाळवाडी (कु.), तांबेवाडी, दहिगाव, देशमुखवाडी, धर्मपुरी, पळसमंडळ, पिंपरी, पिरळे, फोंडशिरस, बांगर्डे, मोरोची, लोंढे मोहितेवाडी, लोणंद, शिंदेवाडी, हनुमानवाडी, नातेपुते आदी गावांचा समावेश असणार आहे.
पिलीव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिलीव येथे काळमवाडी, कुसमोड, कोळेगाव, खुडूस, गारवड, चांदापुरी, झिंजेवस्ती, बचेरी, झंजेवाडी (खु.), डोंबाळवाडी (खु.), तांदुळवाडी, निमगाव (म.), पठाणवस्ती, पिलीव, फळवणी, मळोली, शिंगोर्णी, शेंडेचिंच, सुळेवाडी आदी गावांचा समावेश असणार आहे.
महाळुंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंग येथे उंबरे वेळापूर, कोंढारपट्टा, खळवे, जांभुड, तोंडले, दसुर, नेवरे, बाभुळगाव, बोरगाव, माळखांबी, माळेवाडी (बो.), मिरे, लवंग, वाघोली, वाफेगाव, बोंडले, विठ्ठलवाडी, महाळुंग या गावांचा समावेश असणार आहे.
सहकारी संस्था मतदार संघातील मतदारांना चार मतपत्रिका मिळतील. त्यामध्ये एका मतपत्रिकेवर सात शिक्के, दुसऱ्या मतपत्रिकेवर दोन शिक्के, तिसऱ्या मतपत्रिकेवर एक शिक्का, चौथ्या मतपत्रिकेवर एक शिक्का असे अकरा शिक्के मारण्याचा अधिकार आहे. ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांना तीन मतपत्रिका मिळतील. त्यापैकी एका मतपत्रिकेवर दोन मताचा अधिकार, दुसऱ्या मतपत्रिकेवर एक मताचा अधिकार, तिसऱ्या मतपत्रिकेवर एक मताचा अधिकार असे ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांना चार मताचा अधिकार आहे. व्यापारी मतदार संघातील मतदारांना एक मतपत्रिका मिळेल. त्यावर दोन मताचा अधिकार आहे. हमाल व तोलार मतदारसंघातील मतदारांना एक मतपत्रिका मिळणार आहे, त्यावर एक मताचा अधिकार आहे.
मतदान शुक्रवार दि. २८/०४/२०२३ रोजी सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी दि. २९/०४/२०२३ रोजी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील गोदाम (गोडाऊन) मध्ये होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री. एम. एल. शिंदे काम पाहत आहेत. त्यांना सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहकार्य करीत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Existe uma maneira melhor de localizar rapidamente um telefone celular sem ser descoberto por ele? https://www.mycellspy.com/br/tutorials/how-to-locate-the-other-party-location-by-camera/