अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यांचा शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम…
भूमाता अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानात मका बियाणे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे.
नातेपुते ( बारामती झटका )
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष निमंत्रित माजी संचालक सुधीर तानाजी काळे यांनी शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम भूमाता अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्था मर्यादित नातेपुते, ता. माळशिरस, या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानात मका बियाणे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. संस्थेचे माळशिरस तालुका कार्यक्षेत्र आहे. यामध्ये चारा पिकाची मका व ज्यादा उत्पादन देणारे मका अशा मका वाण जातीचे मका बियाणे वाटप करून तालुक्यातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना सुजलाम सुफलाम करण्याचा मनोदय संस्थेचे कार्यक्षम चेअरमन सुधीर तानाजी काळे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे शेतकऱ्यांमधून कौतुक केले जात आहे.
सुशील काळे व सुधीर काळे दोघेही ॲग्री पदवीधर आहेत. ॲग्री होऊन सुद्धा नोकरीच्या पाठीमागे न लागता शेती व्यवसायास पूरक असे उद्योग व्यवसाय सुरू करून राम लक्ष्मणासारख्या असणाऱ्या सुशील व सुधीर या दोन बंधूंचे कायम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम सुरू आहे. सुशील काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमाता अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्थेच्या माध्यमातून चेअरमन सुधीर काळे यांनी माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानात मका बियाणांचे वाटप धुमधडाक्यात सुरू केलेले आहे. तांबेवाडी या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानात मका बियाणाचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन सुधीर काळे, तांबेवाडी गावाचे उपसरपंच सागर तांबे, हनुमंत पवार, सचिन साळुंखे, अभिजीत शिंदे, किसन चव्हाण, अक्षय शिंदे, शंकर शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

भूमाता संस्थेचे चेअरमन सुधीर काळे यांनी बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना या स्तुत्य उपक्रमाची माहिती देताना सांगितले, आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा, शेतकरी पिकांना हमीभाव नसल्याने उत्पन्न काढूनसुद्धा शेती तोट्यात आहे. कधी कधी शेतकऱ्यांना बाजारात खोटे बियाणे खरेदी करून नुकसानाला सामोरे जावे लागते. अगोदरच मेटाकुटीला आलेला शेतकरी निसर्गाची अवकृपा व बाजारातील तेजी-मंदी यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडत चाललेले आहे. अशा वेळी जगाचा पोशिंदा शेतकरी याला मदत म्हणून शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने आपल्यामध्ये अनेक दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या मका पिकाच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर मका पिकाची व मका उत्पादनाची अशी मकेचे बियाणे देऊन ग्रामीण भागातील शेतकरी सुदृढ व सुजलाम सुफलाम व्हावा हा या मागचा उद्देश असल्याचे चेअरमन सुधीर काळे यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng