अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथे वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन महादेव मंदिर येथे करण्यात आले. बसवेश्वर चौक येथे बसवेश्वरांच्या पुतळ्याचे पूजन, अभिषेक व पुष्पवृष्टी समाजाच्यावतीने करण्यात येऊन महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील त्यांनी बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही बसवेश्वरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाजाचे अध्यक्ष अशोक शेटे, उपाध्यक्ष विलास क्षीरसागर, नागेश लिगाडे, नितीन आरवे, त्रिंबक गुळवे, कुंभार समाजाचे अध्यक्ष अमित कुंभार, शिव निर्णय संघटनेचे उत्कर्ष शेटे यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा शुभारंभ वेळापूरचे शिवाचार्य श्री गुरु मुक्तेश्वर महाराज व माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी समाजाचे श्री. अमृत व सौ. भाग्यश्री हांडे या उभयतांना आरतीचा मान मिळाला. यावेळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे, समाजाचे कार्यकर्ते उदय शेटे, संदीप कुंभार, जगदीश स्वामी, पिंटू वैद्य, चंद्रकांत शेटे, उमेश शेटे आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्त प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो महिला पुरुषांसह युवकांनीही मोठा सहभाग घेतला होता. तसेच मुस्लिम बंधूही सहभागी झाले होते.
यावेळी महिलांचे ढोलीबाजा पारंपरिक खेळ लेझीम पथक घोडेस्वार हे मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले. सदर मिरवणूकीमध्ये महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. प्रथमच लिंगायत समाजातील महिलांनी प्रशिक्षण घेऊन ढोल ताशा आकर्षक रितीने मिरवणुकीत सादर केला.
वीरशैव लिंगायत समाजबांधव यांच्या लेझीम पथकाने आपली कला सादर केली असून याचे नियोजन शिवनिर्णय संघटना यांनी केले आहे. मिरवणूक अकलूजमधील प्रमुख मार्गावरून महादेव मंदिर येथे मंदिरामध्ये विसर्जित करून आरती व पूजन करण्यात आले. मिरवणूक समाप्तीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Si vous envisagez d’utiliser une application d’espionnage de téléphone portable, vous avez fait le bon choix. https://www.mycellspy.com/fr/tutorials/best-cell-phone-spy-apps-online-free-trials/
Insightful and well-written! Your points are thought-provoking. For those wanting to learn more about this topic, here’s a great resource: FIND OUT MORE. Interested in hearing everyone’s perspective!