Uncategorizedताज्या बातम्या

……अखेर चांदापुरी पठाणवस्तीमध्ये आठवडा बाजार भरला…

चांदापुरी (बारामती झटका) रशिद शेख यांजकडून

केवळ माळशिरस तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील गावांशी सर्वदुर संपर्क करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील प्रगतीशील व्यवसायाचेअग्रगण्य गाव चांदापुरी पठाणवस्ती येथे जनतेच्या सोयींसाठी आठवडा बाजार भरणे आत्यंतिक गरजेचे होते. यासाठी पठाणवस्ती गावचे लोकनियुक्त सरपंच एजाजभाई पठाण व चांदापुरी गावचे लोकनियुक्त सरपंच जयवंतआण्णा सुळ या दोघांनी मिळुन कृषी उत्पन्न बाजार समिती अकलुजकडुन बाजारासाठी मंजुरी मिळवली. काल रविवार दि. 25 जुन 2023 रोजी चांदापुरी पठाणवस्ती चौकामध्ये आठवडा बाजाराचे उद्घाटन अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

या परिसरातील साखर कारखान्यामुळे एकुणच आर्थिक व्यावसायिक स्तरावर अमुलाग्र बदल घडुन आले आहे. मोठ्या प्रमाणावर ऊसशेती, मका, द्राक्षबागा याबरोबरच इतर शेतीमालाच्या भरघोस सुजलाम् सुफलाम झाला आहे. आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होत आहे. कालच्या बाजाराला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्यांदाच भरलेल्या बाजारात व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. चांदापुरी पठाणवस्ती येथील बाजाराचा फायदा मगरवाड़ी, गारवाड, तरंगफळ तसेच अनेक वाडीवस्तीवरील लोकांना खरेदी.विक्री करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे दोन्ही गावच्या सरपंचाचे सर्वांनी आभार मानले आहे. भविष्यात हा आठवडा बाजार खुप मोठा होईल, असे व्यापारी वर्गातुन बोलले जात होते.

यावेळी चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ, उपसरपंच तात्यासाहेब चोरमले, पठाणवस्तीचे सरपंच एजाज पठाण, उपसरपंच तानाजी सुळ, जेष्ठ नेते केशवराव (लिंगाआबा) पाटील, जि. प. सदस्य गणेश पाटील, युवानेते विजयदादा पाटील, चांदापुरी सोसायटीचे चेअरमन तन्वीर पठाण, शब्बीर पठाण सर, तिसमारखान पठाण, फारुखखान पठाण, शाहिद शेख, भुनिर शेख, प्रमोद भैय्या मगर, नाथा सरक, अशोक सोनवणे, इंतीयाज पठाण, संतोष सरक, काळमवाडीचे माजी सरपंच दादासाहेब शिंगाडे, कदिर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort