…अखेर वादग्रस्त भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक प्रिया पाटील यांची उचलबांगडी..
बारामती झटका इफेक्ट, बारामती झटकाने नागरिकांच्या तक्रारीचा केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले…
माळशिरस (बारामती झटका)
भूमी अभिलेख कार्यालय माळशिरस येथील वादग्रस्त असणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक प्रिया पाटील यांची उचलबांगडी होऊन त्यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात आलेली आहे. उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या विरोधात अनेक तक्रारीचा पाढा तक्रारदारांनी अनेकांकडे वाचलेला होता. तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्रीसदस्यीय समितीची स्थापना करून कार्यालयीन कामकाजाची चौकशी केली होते. सदर समितीसमोर अनेक नागरिकांनी तक्रारी मांडलेल्या होत्या. सदरच्या दिवशी बारामती झटका वेब पोर्टल व यु-ट्युब चॅनेल ने लाईव्ह प्रक्षेपण करून तक्रारदारांची गाऱ्हाणी अधिकारी व समाजासमोर मांडलेली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने अखेर प्रिया पाटील यांची माळशिरस तालुक्यातून उचलबांगडी केलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय माळशिरस येथे कार्यरत असणाऱ्या भूमी अधीक्षक श्रीमती प्रिया पाटील मॅडम यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याकरिता तीन सदस्य समितीची निवड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांचे कार्यालयाचे सुदाम जाधव जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर यांनी पत्र काढले होते. अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांचेकडील विशेष तपासणी पथक भूमी अभिलेख औरंगाबाद यांचे आदेशान्वये तीन सदस्य समिती नेमलेली होती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणात भूमी अभिलेख माळशिरस यांच्याकडून पीडित व बाधित शेतकऱ्यांना नाहक त्रास दिलेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे कार्यालयाकडून चुकीचे भूमापन झालेले असल्याने अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. सुदाम जाधव यांच्या रूपाने अन्यायाला वाचा फुटली आहे.
फक्त बदली करून चालणार नाही तर खातेनिहाय चौकशी करावी या मागणीने नागरिकातून जोर धरलेला आहे. कार्यालयामध्ये बेकायदेशीर कामकाज थांबले पाहिजे अशी ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in this piece! For more, visit: FIND OUT MORE. Let’s chat about it!