Uncategorized

अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तालुक्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटणार – खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर

माढा लोकसभेचे खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा मतदार संघातील माळशिरस, माढा आणि करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाचा दौरा

करमाळा ( बारामती झटका )

माढा लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस, माढा आणि करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून प्रशासनातील अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन जास्त बाधित गावे अथवा तालुक्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याकरिता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याकरता विनंती करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आसवानी प्रकल्प विस्तारिकरण व गळीत हंगामाचा शुभारंभ महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सरसकट पंचनामे करण्याचे आदेश जाहीर सभेमध्ये व्यासपीठावरून दिलेले होते.

कार्यक्रम संपल्यानंतर खासदार यांनी माढा तालुक्यातील चोबे पिंपळी येथे सदृश ढगफुटी झालेली होती. अशा गावाला भेट देऊन करमाळा तालुक्यातील केम, सालसे, मिरगव्हाण, गुळसडी अशा बाधित गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बळीराजाला दिलासा दिलेला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या एकाही शेतकऱ्याचे पंचनामे राहणार नाहीत, याची प्रशासनाने काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. अनेक गावे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होऊन बाधित झालेली आहेत. तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झालेले आहे.

मतदार संघातील तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याकरता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांवर भयंकर संकट आलेले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याचे चित्र असून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. अतिवृष्टी होऊन काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरी सर्वच पिकांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने थैमान घातलेले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. अशा मतदार संघातील तालुक्यांच्या बाधित गावांना भेटी देऊन कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देऊन शासनाची सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button