Uncategorizedक्रीडाताज्या बातम्या

अत्यंत आनंदाची बातमी : माळशिरसच्या पै. श्रद्धा खरात कन्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

उत्तराखंड हरिद्वार येथे स्टुडन्ट ऑलिंपिक असोसिएशन स्पर्धेमध्ये 40 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकविले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मलेशियाला खेळणार.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस प्रशाला माळशिरस येथील विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा संतोष खरात हिने उत्तराखंड हरिद्वार येथील नवव्या स्टुडन्ट ऑलिंपिक असोसिएशन नॅशनल स्पर्धेमध्ये 14 वयोगटात 40 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावलेले आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मलेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे माळशिरसच्या श्रद्धा खरात कन्येने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोडला आहे माळशिरस तालुक्याच्या कुस्ती क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या श्रद्धा खरात हिच्या यशामध्ये माळशिरस प्रशाला माळशिरसचे प्राचार्य शिक्षक आई-वडील व मल्लसम्राट व्यायाम तालमीचे वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभलेले आहे.
कुमारी श्रद्धा संतोष खरात माळशिरस प्रशाला माळशिरस येथे आठवी मध्ये शिकत आहे तिने कुस्ती मल्लविद्या संकुल पोलीस मुख्यालय कळंबोली येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेला होता. प्रशालेतील प्राचार्य व शिक्षक यांच्याबरोबर मल्लसम्राट व्यायाम तालमीचे वस्ताद एडवोकेट आप्पासाहेब वाघमोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले होते सदर तालमीतील आठ मुले व श्रद्धा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली होती दरम्यानच्या काळामध्ये पालखी सोहळा व पाऊस सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या तब्येतीत बिघाड झालेली होती तर काही आर्थिक अडचणीमुळे मलेशियाच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकले नव्हते कुमारी श्रद्धा खरात हीची सुद्धा आर्थिक परस्थिती नाही. वडील संतोष खरात चार चाकी गाडी चालवून उदरनिर्वाह करीत आहेत परिस्थितीत हलाक्याची व बेताची आहे. तरीसुद्धा सर्वांच्या सहकार्याने श्रद्धाला उत्तराखंड हरिद्वार येथे स्पर्धेसाठी पाठवलेले होते कुमारी श्रद्धा हिने दैदिप्यमान यश मिळवून माळशिरस करांची मान उंचावलेली आहे. गुरुजनांचे आशीर्वाद आई-वडिलांचे कष्ट आणि श्रद्धा हिची जिद्द चिकाटी मेहनत या बळावर सुवर्णपदक मिळवलेल्या श्रद्धा खरात हिला मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी बारामती झटका परिवार संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचे कडून खूप खूप मनापासून शुभेच्छा आहेत
.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort