Uncategorized

….अन् डायलिसिस सेंटरचे नाव तात्काळ बदलले

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मनाचा मोठेपणा

करमाळा (बारामती झटका)

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आपण पुढे घेऊन समाजकारण व राजकारण करत असून यामुळे या डायलिसिस सेंटरला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव द्या, अशी सूचना वजा आदेश देत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी करमाळ्यातील खासदार श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटरचे नाव बदलण्याच्या सूचना दिल्या. यामुळे आयोजकाची चांगलीच धांदल उडाली

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने करमाळा डायलिसिस सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. या डायलिसिस सेंटरला पहिल्यांदा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर असे नाव देण्यात आले होते. या नावाप्रमाणे सर्व रजिस्ट्रेशन जाहिरात डिजिटल बोर्ड करण्यात आले होते व या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाला ते वेळेअभावी येऊ शकले नाहीत.

मात्र त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी ऑनलाईन संपर्क साधला. यावेळी त्यांना सर्व डिजिटल बोर्ड, फ्लेक्सवर डॉक्टर श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर असे नाव दिसले व त्यांचे सर्वत्र होर्डिंग लावल्याचे दिसले. हे पाहून खासदार श्रीकांत शिंदे यांनी ऑनलाईनच व्यासपीठावर उपस्थित असलेले खा. सुजय विखे पाटील, खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आ. शहाजीबापू पाटील, बाळासाहेबांचे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांना ऑनलाईन द्वारे या डायलिसिस सेंटरचे नाव बदलण्याच्या सूचना देऊन हा माझा आदेश वजा सूचना समजून आत्तापासून डायलिसिस सेंटरचे नाव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डायलिसिस सेंटर असे करावे व त्याची घोषणा खासदार सुजय विखे पाटील यांनी करावी असे सांगितले.

यावेळी तात्काळ खासदार सुजय विखे यांनी कार्यक्रमातच या डायलिसिस सेंटरचे नाव बदलून आत्तापासून हे डायलिसिस सेंटर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाने ओळखले जाईल, असे जाहीर केले. यावेळी फेसबुकद्वारे ऑनलाइन शुभेच्छा देताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले की, करमाळासारख्या दुर्गम भागात डायलिसिस सेंटर सुरू होत आहे ही, सर्वसामान्य रुग्णांसाठी आनंदाची गोष्ट आहे. डायलिसिस करण्यासाठी रुग्णांना शंभर-शंभर किलोमीटर दूर जावे लागते. ती सेवा आपल्या गावातच सुरू झाल्यामुळे रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. शिवाय या हॉस्पिटलचा समावेश लवकरच महात्मा फुले योजनेअंतर्गत होणार असल्यामुळे या हॉस्पिटलमधील सेवा रुग्णांना मोफत मिळणार आहेत. तालुका पातळीवर डायलिसिस सेंटर उभा करणे या प्रयोगाची आता करमाळ्यातून सुरुवात झाला असून महाराष्ट्रातील 288 तालुक्यात प्रत्येक ठिकाणी डायलिसिस सेंटर उभा करण्यासाठी माझे प्रयत्न असून याला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.

एका बाजूला लोक नेतेमंडळी स्वतःचे नावाची प्रसिद्धी करण्यासाठी किंवा एखाद्या संस्थेला स्वतःचे नाव देण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. मात्र, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचे नाव कमी करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव डायलिसिस सेंटरला देण्याच्या सूचना देऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे, याची सर्वत्र चर्चा सुरू होती.


आम्ही श्री कमला भवानी देवी ब्लड बँक या नावाने एक महिन्यापूर्वी ब्लड बँक सुरू केली असून आता खा. डॉ. श्रीकांत शिंदे या नावाने डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. मात्र, आता खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार या डायलिसिस सेंटरचे नाव बदलून आजपासून ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे डायलिसिस सेंटर‘ म्हणून ओळखले जाईल असे प्रतिपादन कै. मनोहरपंत चिवटे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक दीपक पाटणे यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button