अश्विनीताईंना युवकांनी विजयी करून लक्ष्मणभाऊंना कृतीतून श्रद्धांजली देऊ – खासदार तेजस्वी सूर्या.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांचे महाराष्ट्रात जंगी स्वागत…
पुणे ( बारामती झटका )
पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांना प्रचंड मताने विजयी करण्याकरता युवकांनी तन-मन-धन एक करून अश्विनीताई यांना विजयी करून खऱ्या अर्थाने स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांना खरी श्रद्धांजली वाहूया, असे मत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी ‘युवकांशी सुसंवाद’ या कार्यक्रमांमध्ये बोलताना सांगितले.

पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. तेजस्वी सूर्या यांचे पुणे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, राष्ट्रीय सचिव गौरव गौतम, प्रदेश महामंत्री सुशील मेंगडे आदी मान्यवरांसह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये युवकांना संबोधित करून राष्ट्र प्रथम ही भावना मनात चेतवून देश कार्यासाठी कार्य करण्यासाठी युवकांनी प्रेरित होणे गरजेचे असल्याचे सांगून स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी खऱ्या अर्थाने पक्षनिष्ठा जोपासली आहे. त्यांनी पक्षनिष्ठा वेळोवेळी दाखवून दिलेली आहे. अश्विनीताई यांना प्रचंड मतांनी विजयी करून लक्ष्मणभाऊंना कृतीतून श्रद्धांजली देण्याचे आवाहन युवकांना केले.
यावेळी आ. महेशदादा लांडगे यांच्यासह भाजपचे व युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
