आपुलिया हिता जो असे जागता ! धन्य माता पिता तयाचिया ! कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक ! तयाचा हरिक वाटे देवा !!
लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी पाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्तुत्वाने प्रचिती येत आहे.
माळशिरस (बारामती झटका)
सातारा जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी निरा देवधर रखडलेल्या कॅनॉलचे स्वप्न उराशी बाळगून निरा देवधर संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समवेत आंदोलने, मोर्चे काढून अल्पभूधारक व सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू होते. केंद्रात व राज्यातील सरकारच्या उदासीनतेमुळे लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे निरा देवधर कॅनॉलचे स्वप्न अपुरे राहिलेले होते. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या पश्चात त्यांचे पुत्र माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्तृत्वातून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या वाक्याची प्रचिती येत आहे. निरा देवधर कॅनलच्या पाण्याने हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या विषयी आपुलिया हिता जो असे जागता ! धन्य माता पिता तयाचिया ! कुळी कन्या पुत्र होती जी सात्वीक ! तयाचा हरिख वाटे देवा! या तुकाराम महाराजांच्या अभंगाची आठवण येत आहे.
लोकनेते स्वर्गीय हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी तमाम शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या जिव्हाळ्याची असणारी निरा देवधर कॅनॉलची योजना व्हावी यासाठी संघर्ष उभा केलेला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र योगायोगाने माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार झाले. केंद्रात नरेंद्रजी मोदी व राज्यात कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी सदरच्या योजनेची पाणीदार व कर्तव्यदक्ष खासदार यांची धडपड व पाठपुरावा यामुळे तातडीची राज्य सरकारची बैठक घेऊन निरा देवधर कॅनॉलच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन बजेटमध्ये निधी उपलब्ध करून दिलेला होता.
सध्या नीरा देवधर कॅनॉलच्या रखडलेल्या प्रकल्पाचे टेंडर निघालेले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक सिंचनासह वेगवेगळे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. माळशिरस तालुक्याने सर्वात जास्त मतदान लोकसभेच्या वेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेले होते. मतदारांचे मताचे ओझे कार्यातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कमी केलेले आहे. इंग्रजकालीन लोणंद-फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न, रखडलेला निरा-देवधर कॅनॉल चा प्रश्न, सातारा, सोलापूर, मराठवाडा यांच्या जिव्हाळ्याचा असणारा कृष्णा भीमा स्थिरीकरण या प्रकल्पाला कृष्णा खोरे प्लड डायव्हर्शन योजना मान्यता घेतलेली आहे, असे अनेक सिंचनाच्या प्रकल्पाबरोबर रस्ते व इतर विकासकामे केलेली आहेत.
खासदार वडिलांनी पाहिलेले स्वप्न खासदार पुत्राने पूर्ण केलेले राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे. लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे अधुरे स्वप्न पाणीदार व कार्यतत्पर खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केलेले आहे. ‘पुत्र व्हावा ऐसा, त्याचा त्रिलोकी झेंडा’, या म्हणीचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे.
पाणीदार खासदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना केंद्रात व राज्यात तत्कालीन सरकार असताना सुद्धा निरा-देवधर ची योजना रेंगाळलेली होती. शेतकऱ्यांना माझ्या लाल दिव्याच्या गाडीवर दगड मारा म्हणणारा एकमेव युवा नेता रणजीतसिंह नाईक निंबाळकर होते. त्याच युवा नेत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रातील देव नरेंद्र व राज्यातील देव देवेंद्र यांच्याकडून योजना मार्गी लावलेली असल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनता यांच्या मधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Ofokfojfief jwlkfeejereghfj iewojfekfjergij wiojewjfewitghuhwrgtjgh ewjhfwqjhdfuewgtuiwe huegfrwgyewgtywegt baramatizatka.com