आमदार राम सातपुतेंच्या मागणीनंतर पशुसंवर्धन विभाग लागला कामाला
लम्पीबाधित जनावरांच्या उपचारासाठी तज्ञ अधिकाऱ्यांचे दोन पथके दाखल
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील लम्पी बाधित जनावरांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच जनावरांच्या मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. याच अनुषंगाने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी पशुसंवर्धन मंत्र्यांकडे लम्पीमुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या नुकसान भरपाईपोटी तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच जनावरांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता चिंता व्यक्त करत तज्ञ डॉक्टरांचे पथक पाठविण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून पुणे व उदगीर येथील तज्ञ अधिकाऱ्यांचे पथक हे माळशिरस मतदार संघात दाखल झाले आहे. या पथकांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यातील एक पथक हे नातेपुते व शेजारील गावात तर दुसरे पथक हे कोंडबावी, अकलूज या भागात लंपीबाधित जनावरांवर उपचार करत आहे.
दि. ३ नोव्हेंबरपर्यंत माळशिरस तालुक्यामध्ये १३५९ जनावरे ही लंपीबाधित होती. यापैकी १८० जनावरे ही अंत्यवस्थ स्थितीत होती. तर तालुक्यात आतापर्यंत १२६ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. आजारी जनावरांवर सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी बरे करण्याकरिता प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करीत होते. तरीदेखील जनावरांचा मृत्यूचे प्रमाण हे वाढत होत. याच अनुषंगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आ. राम सातपुते यांनी पशुसंवर्धन विभागाकडे चिंता व्यक्त केल्यानंतर हे दोन पथक दाखल झाल्याने लम्पीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच या आजारामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आ. सातपुते यांनी केले असून सरकार ठामपणे आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
What an enlightening article! It provided a lot of food for thought. Let’s discuss this further. Click on my nickname for more!