आरोग्यदूत आमदार राम सातपुते यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीची रुग्णांकडून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे..
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील अनेक जाती धर्मातील लोकांच्या वेगवेगळ्या अवयवाचे मोफत ऑपरेशन करून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला आधार देऊन माळशिरस तालुक्यामध्ये ते आरोग्यदूत आमदार म्हणून परिचित झालेले आहेत. मतदार संघात सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, समारंभ, उद्घाटन व भेटीगाठी कार्यक्रमासाठी नेहमी कोणत्याही रस्त्याने जात असतात. परवा आरोग्यदूत आमदार राम सातपुते मोटेवाडी, माळशिरस या गावावरून जाणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष वैजनाथ पालवे व त्यांचा पुतण्या बबलू पालवे यांना मिळाली होती. आमदार राम सातपुते यांची ते वाट पाहत होते. आमदारांची गाडी येताच दोघांनीही हात दाखवून गाडी थांबवली. लोकप्रिय दमदार आमदार गाडीतून उतरून काका पुतण्यांकडे आल्यानंतर त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. कुस्ती खेळत असताना दुसरी कुस्ती मानेवर पडलेली असल्याने मानेचे ऑपरेशन करावे लागलेले होते. आपल्या सहकार्यातून मोफत ऑपरेशन केलेले आहे असे सांगून, ऑपरेशन केल्यामुळे सध्या बबलू यांची तब्येत चांगली असल्याचे सांगून आपल्या आरोग्य सेवेतील कामगिरीमुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना अडचणीच्या काळात मदत होत असल्याचे वैजनाथ पालवे यांनी सांगितले. यावरून आरोग्य दूत आमदार यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीची रुग्णांकडून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. पै. बबलू पालवे याची आस्थेने विचारपूस व चौकशी करून लवकरच पैलवान आखाड्यामध्ये दंड थोपटणार असल्याने आरोग्यदूत म्हणून केलेल्या कार्याने आमदार राम सातपुते यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जात होता.
माळशिरस विधानसभा मतदार संघातील अनेक जाती-धर्मातील महिला, पुरुष, लहान मुले यांची वेगवेगळ्या अवयवांची पुणे व मुंबई येथे शस्त्रक्रिया केलेली असल्याने आरोग्यदूत म्हणून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची माळशिरस विधानसभा मतदारसंघात नव्याने ओळख झालेली आहे. केलेल्या कार्यकर्तृत्वाचा वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीची रुग्णांकडून कृतज्ञता व्यक्त होत असल्याने आमदार राम सातपुते यांना जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून केलेल्या कार्याबद्दल समाधान होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng