आर्थिक सक्षमीकरण हाच एकमेव पर्याय -बागल संभाजी ब्रिगेडचे पुण्यात 28 डिसेंबरला रौप्य महोत्सवी अधिवेशन
कुर्डूवाडी (बारामती झटका)
स्व. अण्णासाहेब पाटील यांच्यापासून ते अगदी मराठा क्रांती मोर्चात शहीद झालेल्या चाळीस बांधवांपर्यंत मराठा समाजाने खूप काही गोष्टी गमावल्या आहेत . पण आरक्षण अद्याप पदरात पडले नाही , कायदेशीर लढाई सुरू राहिलं पण समाजाची व तरुणांची प्रगती करायची असेल तर समाजाने अ आरक्षणाकडून अ अर्थकारणाकडे वाटचाल केली पाहिजे. उद्योग -व्यापार- व्यवसाय -नोकरी या गोष्टीमध्ये समाजातील तरुणांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. आंदोलन ,उपोषण ,मोर्चे ,जातीय धार्मिक वादांपासून तरुणांनी बाजूला व्हावे. समाजाच्या प्रगतीसाठी फक्त आणि फक्त आर्थिक सक्षमीकरण हाच एकमेव पर्याय आहे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते हर्षल बागल यांनी येथील आयोजित पदनियुक्ती कार्यक्रमात बोलताना केले.
संभाजी ब्रिगेडला 28 डिसेंबर रोजी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे राज्यव्यापी रौप्य महोत्सवी अधिवेशन पुणे येथे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच ला आयोजित केले आहे. या अधिवेशनाच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले पंढरपूर विभागाचे अध्यक्ष प्रदीप मिसाळ सोलापूर महानगर अध्यक्ष श्याम कदम शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिताराम बाबर, अमोल उबाळे प्रशांत बागल तुषार हाके ,प्रा विकास पाटील उपस्थित होते.
या अधिवेशनाला छत्रपती घराण्यातील प्रमुख लोकांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे या अधिवेशनात एकूण तीन सत्र होणार आहेत बहुजन समाजाशी संवाद एक विशेष सतरा आयोजित केले आहे त्याचबरोबर आरक्षणाकडून अर्थकारणाकडे वाटचाल ही एक विशेष सत्र आयोजित केले आहे.
या इतिहासाचार्य त्रिमूर्तींचा होणार सन्मान
महाराष्ट्राला इतिहासाची परंपरा आहे ,या परंपरेला आपल्या लेखणीतून जिवंत ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर साळुंखे व नागपूरचे मामा देशमुख या तीन इतिहासकारांना छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर व ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने संभाजी ब्रिगेड सन्मानित करणार आहे. या महत्त्वाच्या तीन इतिहासकारांचा इतिहासात प्रथमच एकत्रित सन्मान होत आहे.
चौकट
बार्शी व माढा तालुक्यातील निवडी संपन्न
संभाजी ब्रिगेड बार्शी तालुका अध्यक्षपदी दिग्विजय मोहिते यांची तर माढा तालुका अध्यक्षपदी सौरभ भोसले उपाध्यक्षपदी साहेबराव उबाळे कार्याध्यक्षपदी प्रशांत करंडे तर कुर्डूवाडी शहराध्यक्षपदी नवनाथ करंडे यांच्या निवडी करण्यात आल्या.
चौकट
महावितरणच्या कायमस्वरूपी नियुक्ती आंदोलनाला संभाजी ब्रिगेडच्या पाठिंबा
गेल्या दहा-बारा वर्षांपासून महावितरण मध्ये 30 ते 32 हजार कंत्राटी कर्मचारी अविरतपणे सेवा देत आहेत. आसाम व ओडिसा या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना देखील कायमस्वरूपी शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात यावी या मागणीला संभाजी ब्रिगेडने महावितरण कंत्राटी कर्मचारी युनियन ला जाहीर पाठिंबा लेखी पत्राद्वारे दिला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng