Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे प्रदर्शन पाहायला मिळाले…

आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासंदर्भात सिंचनभवन पुणे येथील बैठकीत “वराती मागून घोडे” असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले…

पुणे (बारामती झटका)

करमाळा, माढा आणि माळशिरस तालुक्यातील उजनी, कुकडी, कृष्णा मराठवाडा प्रकल्प, सिना कोळेगाव, नीरा देवघर सिंचन व पुनर्वसन संदर्भातील करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यातील अडीअडचणी संदर्भात आमदार रणजितसिंह मोहि तेपाटील यांनी सिंचन भवन, पुणे येथे कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, पुणे विभागाचे मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, विशेष प्रकल्पाचे मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावरून आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे प्रदर्शन पाहावयास मिळालेले आहे. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासंदर्भात सिंचन भवन पुणे येथे बैठक घेऊन ‘वराती मागून घोडे’, अशी अवस्था झालेली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प व सिंचनाच्या प्रश्नासाठी आढावा बैठकीचे आयोजन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. सदरच्या बैठकीस सांगोला विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील, करमाळा विधानसभेचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, माण-खटाव मतदार संघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे, फलटण मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार दीपकराव चव्हाण, असे सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. अधिकारी यांच्या समवेत अनेक विषयावर सकारात्मक चर्चा व तोडगा निघालेला असल्याने मतदार संघातील अनेक प्रलंबित सिंचनाचे प्रश्न निकाली निघाले असल्याने आमदार यांनी पत्रकारांना माहिती देत असताना सदरच्या बैठकीमध्ये सिंचनाच्या प्रश्नावर समाधान व्यक्त केले होते. सदरच्या बैठकीचे सोशल मीडियावर माढा लोकसभा मतदारसंघातील व मतदार संघाच्या बाहेरील जनतेने सर्व पाहिलेले होते व ऐकलेले होते, अशी सर्वसमावेशक बैठक झालेली असताना आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी राजकीय अपरिपक्वतेचे प्रदर्शन केले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पाणी हे जीवन आहे. सिंचनाच्या प्रश्नासाठी आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी यांनी बैठक घ्यावी आणि घेतलीच पाहिजे. मात्र, सिंचन भवन येथे झालेली बैठक खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत पुन्हा तेच विषय घेऊन बैठक त्याच अधिकाऱ्यांसमवेत घेणे म्हणजे राजकीय परिपक्वता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सविनय चर्चिली जात आहे. कारण आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, जलसंपदा विभागाचे सचिव अशा समवेत बैठक आयोजित केली असती तर वेगळा विषय झाला असता. मात्र सिंचन भवनमध्ये कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक करून काय साध्य केलं, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण माढा लोकसभा मतदारसंघातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सिंचनाच्या प्रश्नावर समाधान व्यक्त केलेले असल्याने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा तेच विषय अधिकाऱ्यांकडून चर्चा घडवून आणलेली आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील मांगी तलाव हा कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करणे, दहिगाव सिंचन योजना प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावित, कुकडी प्रकल्पाचे पाणी करमाळा तालुक्यात मिळणे, सीना माढा उपसा सिंचन योजनेतून वंचित गावांना समाविष्ट करणे, फूट ब्रीज दुरुस्ती, सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना बर्गे उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडल्या. यासह इतर अनेक सिंचन संदर्भातील प्रश्नांवरती चर्चा झाली.

यावेळी आ. राम सातपुते, आ. नारायण पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, पुणे पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप, सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे, अधीक्षक अभियंता कोल्हे, कार्यकारी अभियंता संजय बोडके, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता डुबल, जलतज्ञ अनिल पाटील, शिवाजी कांबळे, भारत पाटील, अजित तळेकर, शिवाजी बंडगर, अमरजीत साळुंखे, महेंद्र पाटील, जगदीश अग्रवाल, शिवशंकर माने, शशिकांत पवार, शशिकांत नरूटे, नितिन कांबळे आदींसह करमाळा, माढा व माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दोन वेळेस विधान परिषदेवर काम केलेले आहे. राज्यसभेवर काही वर्ष काम केलेले आहे. तरीसुद्धा सिंचन भवन येथे खासदार व आमदार यांची सकारात्मक बैठक झालेली असताना पुन्हा त्याच विषयावर बैठक घेतलेली असल्याने राजकीय वर्तुळामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय अपरिपक्वतेच्या चर्चेने उधान घेतलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button