आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि आ. राम सातपुते हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात आणत आहेत विकासगंगा
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांची दमदार कामगिरी, माळशिरस नगरपंचायतीसाठी 50 लाखाचा निधी मंजूर – नगरसेविका पुष्पावती कोळेकर.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आ. राम सातपुते यांचे कार्यकर्त्यांसाठी कार्य – नगरसेविका पुष्पावती महादेव कोळेकर.
माळशिरस ( बारामती झटका )
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या साथीने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनात माळशिरस नगरपंचायतसाठी ५० लाखाचा निधी मंजूर करून आणला आहे. दिलेला शब्द खरा केलेला असल्याचे मत माळशिरस नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका पुष्पावती महादेव कोळेकर यांनी व्यक्त करून माळशिरसकरांच्यावतीने दोन्ही आमदारांचे आभार व्यक्त केले आहे.
माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या माळशिरस नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. संजिवनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकीत निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा सत्कार करीत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते महादेव कोळेकर यांच्या निवासस्थानी लोकप्रिय आ. राम सातपुते यांनी माळशिरस प्रभाग क्रमांक 9 व प्रभाग क्रमांक 16 मधील लोकांनी रस्त्याची अडचण सांगितलेली होती. त्यावेळेला आ. राम सातपुते यांनी शब्द दिला होता, भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आपला प्रश्न मार्गी लावला जाईल. तो शब्द 50 लाख रुपये निधी मंजूर करून खरा केलेला आहे.
दि. 7 जुलै 2022 माळशिरस नगरपंचायत क्षेत्रातील विकास कामे त्यामध्ये मौजे माळशिरस प्रभाग क्रमांक 9 शिंदेमळा येथे रस्ता करणे २५ लाख रुपये व मौजे माळशिरस प्रभाग क्रमांक 16 काळे वस्ती ते गेजगे वस्ती, कोळेकर वस्ती ते ढवळे वस्ती रस्ता करणे 25 लाख रुपये असे दोन रस्त्यास 50 लाख रुपये मंजूर केलेले असल्याची माहिती विद्यमान नगरसेविका सौ. पुष्पावती महादेव कोळेकर यांनी सांगून आगामी काळामध्ये ज्येष्ठ नेत्या संजीवनीताई यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस नगरपंचायतीमधील खुंटलेला विकास करण्याकरता कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रिय आमदार राम सातपुते सदैव जनतेसोबत असतील, असा विश्वास 50 लाख रुपये मंजूर केल्यानंतर आलेला आहे.
निश्चितपणे प्रभागांमधील अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नगरसेविका सौ. पुष्पावती कोळेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्यातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि विधानसभेचे आमदार राम सातपुते तालुक्यात विकासाची गंगा आणत आहेत. तालुक्यामध्ये विविध विकास कामांचा धुमधडाका सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, awesome blog structure! How long have you been blogging for?
you make running a blog glance easy. The total look of your site
is excellent, as smartly as the content! You can see similar here najlepszy sklep