उन्हाचा चटका वाढला, निमगावमधील दत्तात्रय शेंडे यांच्या थंडगार लस्सीकडे ज्येष्ठ नागरिक व युवकांचा लोंढा वाढला.
निमगाव मगराचे येथील दत्तात्रय शेंडे यांच्या भजी, जिलेबी, चहा व खास करून उन्हाळ्यातील थंडगार लस्सीला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती…
निमगाव ( बारामती झटका )
निसर्गामध्ये प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू. त्यामध्ये गुलाबी थंडीचा हिवाळा संपून जानेवारीमध्ये मकर संक्रांतीनंतर कर्क राशीतून मकर राशीत सूर्याचे आगमन होत असते. त्यानंतर उन्हाळा ऋतूला खऱ्या अर्थाने सुरुवात होऊन उन्हाचा चटका वाढत असतो. अशावेळी उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण व्हावे, शरीरामध्ये गारवा निर्माण व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील लोकांचा केमिकलचे थंड पदार्थ सेवन करण्यापेक्षा नैसर्गिक शीतपेयाकडे, गारवा असलेले लिंबू सरबत, मठ्ठा, थंडगार लस्सी याकडे ओढ असते. निमगावमधील दत्तात्रय शेंडे यांच्या थंडगार लस्सीकडे ज्येष्ठ नागरिक व युवकांचा लोंढा वाढत आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने निमगाव गावचे ज्येष्ठ नेते निमगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वसंतराव पाटील, निमगाव गावचे माजी उपसरपंच श्रीमंतनाना मगर, युवा नेते महावीरआप्पा मगर थंडगार लस्सीचा आस्वाद घेत आहेत.
निमगाव मगराचे, ता. माळशिरस या गावामध्ये श्री खंडोबा देवाचे जागृत व पावन असे मंदिर आहे. निमगाव गावाला नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. गावाच्या सभोवताली पाण्याचा तलाव आहेत. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नात निमगाव गाव नेहमी शेतकऱ्यांच्या स्पर्धेत असते. आणि येथे उत्पन्नामध्ये नेहमी अग्रेसर असणारे शेतकरी आहेत. ऊस, केळी, मका या पिकाबरोबर अनेक पिके घेतली जातात. निमगाव गाव हे शैक्षणिक, सांस्कृतिक, कुस्ती क्षेत्र, गजी ढोल अशा अनेक खेळामध्ये सर्व परिचित असणाऱ्या गावांपैकी आहे. ग्रामदैवत मारुती मंदिर चौकामध्ये दत्तात्रय शेंडे यांचे यशराज हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये कायम जिलेबी, भजी व चहा मिळत असतो. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये थंडगार लस्सीसाठी सुप्रसिद्ध शेंडे यांची लस्सी आहे. निमगाव पंचक्रोशीतील अनेक नागरिक काही कामानिमित्त निमगाव गावाला आल्यानंतर यशराज हॉटेल मधील जिलेबी, भजी, चहा व लस्सीचा आस्वाद घेत असतात.
सुप्रसिद्ध दत्तात्रय शेंडे यांच्या यशराज हॉटेलला बारामती झटका वेबपोर्टल आणि युट्युब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचे कडून हार्दिक शुभेच्छा !!!
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng