Uncategorized

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सातारा व पुणे जिल्हा दौरा जाहीर..

देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदार संघाच्या कोअर कमिटीची बैठक आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी संपन्न होणार…

माढा लोकसभेच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे लक्ष, देवेंद्रजी फडवणीस वळव पाडणारांना पुन्हा कामाला जुंपणार …

सातारा (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा गुरुवार दि. 22 जून 2023 रोजी सातारा व पुणे जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम निलेश श्रांगी यांनी जाहीर केलेला आहे. सायंकाळी 07.45 वाजता देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदार संघ कोअर कमिटी बैठक माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी संपन्न होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दौऱ्यास सकाळी 11.45 वाजता मलकापूर कराड येथील विश्रामगृह कृष्ण हॉस्पिटल येथे एमआयडीसी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीने सुरुवात होणार आहे. पाटण तालुक्यातील मनसाई माता मंदिर येथे दर्शन घेऊन कल्याणी ग्राउंड कराड येथे श्री. अतुल भोसले यांच्या नियोजनात जाहीर सभेस उपस्थितीत राहणार आहेत. सभेच्या ठिकाणावरून हेलिकॉप्टरने बरड-निंबळक रोड, ता. फलटण येथे येऊन सातारा जिल्ह्यातील तीन पोलीस स्टेशनचे ऑनलाईन भूमिपूजन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नियोजनात होणार आहे. बरड येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन माण तालुक्यातील बोराटवाडी येथे जाऊन आंधळी धरण परिसरात भेट देऊन गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेअंतर्गत आंधळी उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन करून मोदी @९ आमदार जयकुमार गोरे यांनी आयोजित केलेल्या सभेस उपस्थित राहणार आहेत. सभेनंतर आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघ कोअर कमिटीची बैठक संपन्न होणार आहे.

कार्यकर्त्यांचा भेटीगाठी कार्यक्रम आटोपून रात्री 09.00 वाजता मोटार येणे पुणे विमानतळावर जाऊन मुंबईकडे विमानाने जाणार आहेत.

माढा लोकसभा मतदार संघ महाराष्ट्रात नव्हे तर देशात या मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाने चर्चेत आलेला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राजकीय कौशल्य दाखवून राष्ट्रवादीकडून मतदार संघ हिसकावून घेऊन भाजपचा मतदार संघ केलेला होता. माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्रजी फडवणीस यांनी स्वतः लक्ष घालून सिंचन रस्ते व विविध विकासाच्या कामांना गती व निधी दिलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघ विकासामुळे पुन्हा भाजपच्या ताब्यात राहील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना भाजपमध्येच अंतर्गत कलह सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आलेले असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीला पुन्हा आशावाद निर्माण झालेला आहे. भाजपच्या कमळात बसून अनेकजण घड्याळाची वेळ पाहत असल्याने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधील श्रेयवाद उफाळून आलेला आहे. माढा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभांचा समावेश आहे. विशेष म्हणजे देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे. माढा लोकसभा मतदार संघाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न होत असल्याने अनेक राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिलेले आहे. देवेंद्रजी फडवणीस वळव पाडणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला जुंपणार अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू असल्याने आ. जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी संपन्न होत असणाऱ्या बैठकीकडे भाजपपेक्षा राष्ट्रवादीचे लक्ष जास्त लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button