ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा स्तुत्य उपक्रम..

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण तळावर पर्यावरणाचा समतोल राखून भाविक व वैष्णव यांना दिलासा व गारवा देणारा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला.

सदाशिवनगर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट, श्री शंकर सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायत सदाशिवनगर, ग्रामपंचायत पुरंदावडे यांच्या संयुक्त विद्यमानाने वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम राबवून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील माळशिरस तालुक्यात पहिले गोल रिंगण पुरंदावडे सदाशिवनगर येथे होत असते. पालखी रिंगण सोहळ्यावर पर्यावरणाचा समतोल राखून भाविक व वैष्णव यांना दिलासा व गारवा देणारा समाज उपयोगी उपक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.

यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बापूराव उर्फ मामासाहेब पांढरे, शिवामृत दूध संघाचे व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, सहकार महर्षी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील, नातेपुते नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे, माजी उपसभापती युवा नेते अर्जुनसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, भाजपा महिला तालुका अध्यक्षा सौ. कल्पना कुलकर्णी, एकशिवचे माजी सरपंच शहाजीदादा धायगुडे, भाजपचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुक्तार कोरबु, मेडदचे ज्येष्ठ नेते ह.भ.प. शिवाजीभाऊ तुपे, माजी ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लवटे, उद्योजक दत्तात्रय शेळके, संदीप सावंत पाटील, रत्नत्रय उद्योग समूहाचे अनंतलाल दोशी, पुरंदावडे गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच देविदास उर्फ बाळासाहेब ढोपे, संतोष शिंदे, सुभाष सुज्ञे उर्फ हरी ओम, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, कार्यकारणी, शिवामृत दूध संघांचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, खरेदी-विक्री संघाचे संचालक, श्री शंकर सहकारी कारखान्याचे सर्व संचालक, खातेप्रमुख व कर्मचारी वर्ग सदाशिवनगर, पुरंदावडे, येळीव, जाधववाडी तामशिदवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गावरील अनेक ठिकाणी वृक्षतोड झालेली आहे. भाविक व वैष्णव यांना पालखी सोहळ्या समवेत पायी चालत असताना उन्हाळ्यामध्ये प्रखर सूर्याच्या उष्णतेचा त्रास होतो. अशावेळी वृक्षांची गरज असते. तीच गरज ओळखून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. भविष्यामध्ये वृक्षाच्या छत्रछायेखाली अनेक भाविक व वैष्णव सावलीला विसावणार आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button