एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे ५५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा…
करमाळ्यातील शेतकऱ्यात आनंदोत्सव…
जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या प्रयत्नांना यश…
करमाळा (बारामती झटका)
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या हंगामातील पिकाच्या नुकसान भरपाई करमाळा तालुक्यातील तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५५ कोटी रुपये आज जमा झाले असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने पैसे जमा केल्यामुळे शेतकरी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देत आहेत.
खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे मूग, तूर, कांदा, उडीद आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने तात्काळ पंचनामे झाले होते.
या नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांना मिळावे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून समक्ष निवेदन दिले होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील करमाळा दौऱ्यावर आल्यानंतरसुद्धा बार्शीतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. पण, करमाळ्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, ही बाब पालकमंत्र्याच्या निदर्शनास चिवटे यांनी आणून दिली होती.
महाराष्ट्र शासनाने डीबीटी म्हणजेच डायरेक्ट मनी ट्रान्सफर योजनेमार्फत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा केले आहेत. यामुळे करमाळ्यातील शेतकऱ्यांचा आनंद व्यक्त होत आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे नुकसान भरपाई जमा केल्यामुळे करमाळा शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
अतिवृष्टीमुळे माझे उडीद पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई पोटी आठ हजार रुपये आज माझ्या खात्यावर जमा झाले आहेत. अत्यंत अडचणीच्या काळात ही आठ हजार रुपये मला मिळाल्यामुळे आनंद होत आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले’, या पद्धतीने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम असून त्यांच्या पाठीमागे अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील जनता उभा राहणार असल्याचा विश्वास नागेश शेंडगे यांनी व्यक्त केला. – नागेश शेंडगे शेतकरी कोळगाव
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Loved this article! It’s both insightful and entertaining. For more, check out: EXPLORE FURTHER. What are your thoughts?