Uncategorizedताज्या बातम्या

एक मुखी दत्त मंदिर भूमिपूजन, कीर्तन महोत्सव व माजी सैनिक, डॉक्टर, पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन.

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. सोहम महाराज देहुकर व संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज ह.भ.प. मुरारी महाराज नामदास यांच्या शुभहस्ते भूमिपूजन.

विजयसिंह मोहिते पाटील, सुभाषबापू देशमुख, हर्षवर्धन पाटील, जयसिंह मोहिते पाटील, राम सातपुते, प्रशांत परिचारक, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार.

महाळुंग ( बारामती झटका )

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे आठवे वंशज स्वर्गीय ह.भ.प. मधुसूदन देहूकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजता अकलूज-टेंभुर्णी रोडवर, तांबवे-महाळुंग सीमेवर, पायरीपुल या ठिकाणी एक मुखी दत्त मंदिर भूमिपूजन, कीर्तन महोत्सव व माजी सैनिक, डॉक्टर व पत्रकार यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

एक मुखी दत्त मंदिर भूमिपूजन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह.भ.प. सोहम महाराज देहुकर व श्री संत नामदेव महाराज यांचे सतरावे वंश ह.भ.प. मुरारी महाराज नामदास यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील, माजी सहकार व पणन मंत्री सुभाषबापू देशमुख व सौ. स्मिताकाकी देशमुख, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. अंकिताताई पाटील-ठाकरे, सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व सौ. सुलक्षणादेवी मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धैर्यशील मोहिते पाटील व डॉटर्स माॅम फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ‌. शीतलदेवी मोहिते पाटील, हडपसर कोंढवा माजी आमदार योगेशजी टिळेकर, दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन राजेंद्र गिरमे, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नवे वंशज देहू संस्थांनचे माजी अध्यक्ष ह.भ.प. श्री‌. गुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांचे सायंकाळी ४ ते ६ या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे. सदरच्या कीर्तनात मृदुंग वाजवण्याचे काम मृदुंगाचार्य ह.भ.प. शुभम वायकुळे, ह‌.भ.प. ओंकार जोशी, ह.भ.प. आनंद महाडिक, ह.भ.प. सतीश घोगरे, ह.भ.प. रामकृष्ण मोहिते, कीर्तनाला साथ देण्याकरता संगम, लवंग, बाभुळगाव, वाघोली, गिरवी, गणेशगाव, टणू, गणेशवाडी, शेवरे, नरसिंहपुर, पिंपरी, शिंदे वस्ती, वडापुरी, सुरवड, माळीनगर, अकलूज, माळखांबी, गट नंबर 2, महाळुंग पायरी पुल येथील भजनी मंडळ साथ देणार आहेत.

महोत्सवास ह.भ.प. अंकुश तात्या रणखांबे गिरवी, ह.भ.प. राम महाराज अभंग वडापुरी, ह.भ.प. सुदाम महाराज हिंगे आळंदी, ह.भ.प. अनुकाका काकडे नरसिंगपूर, ह.भ.प. राम महाराज शेरकर सुरवड, ह.भ.प. प्रशांत महाराज चव्हाण लवंग, ह‌.भ.प. मामा महाराज काजळे टणू, ह.भ.प. राम महाराज शेळके गार अकोले, ह.भ.प. सचिन महाराज मोहिते टणू, ह.भ.प. सुग्रीव महाराज मिटकल बाभूळगाव, ह.भ.प. धैर्यशील देशमुख नातेपुते, ह.भ.प. तानाजी कदम लवंग, ह.भ.प. ज्ञानेश्वरी डांगे गोंदी, ह.भ.प. ज्ञानेश्वरी घाडगे टाकळी, ह.भ.प. पायल घुले माळशिरस, श्रीराम गुरुकुल यांचा आशीर्वाद राहणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजक श्री. निळकंठ भोंगळे, श्री. दादासो लाटे, श्री. संजय साळुंखे, श्री. मनोहर जाधव, श्री. कालिदास जमदाडे, श्री‌. आबासाहेब जाधव परळीकर, श्री. विवेक देशमाने व समस्त ग्रामस्थ तांबवे, महाळुंग, पायरी पूल आयोजक आहेत. विशेष सहकार्य अमरसिंह देशमुख मित्र मंडळ अकलूज, जिव्हाळा ग्रुप माळीनगर, मित्र प्रेम ग्रुप अकलूज, मॉडेल हायस्कूल १९९८ माळीनगर, आबा साळुंखे मित्र मंडळ महाळूंग यांचे विशेष सहकार्य राहणार आहे. तरी सर्वांनी एक मुखी दत्त मंदिर भूमिपूजन, कीर्तन महोत्सव, माजी सैनिक, डॉक्टर व पत्रकार यांचा सन्मान सोहळा व कीर्तनानंतर आयोजित केलेल्या स्नेहभोजन या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे, सौ. सुशीला शिवाजी साळुंखे, श्री. शिवाजी शंकर साळुंखे, लोकमंगल समूहाच्या डायरेक्टर सौ. पुनम अभिमन्यू साळुंखे, श्री. अभिमन्यू शिवाजी साळुंखे व समस्त साळुंखे परिवार यांच्या वतीने मित्रपरिवार, नातेवाईक, पंचक्रोशीतील सर्व नागरिक व भाविक भक्तांना वेळेवर उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाचा व स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा असे नम्र आवाहन करण्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort