Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

एमआयटी पंढरपूरची कु. प्रज्ञा जीवन कुलकर्णी विज्ञान शाखेत प्रथम

पंढरपूर (बारामती झटका)

एमआयटी विश्वशांती गुरुकुल वाखरी, पंढरपूर जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून यामध्ये विज्ञान शाखेची कुमारी प्रज्ञा जीवन कुलकर्णी हिने 90% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे, तर वाणिज्य शाखेमध्ये कुमारी माही राजेंद्र बजाज हिने 87.67% गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे.

दोन्ही विभागाचा शंभर टक्के निकाल लागला असून या कामी विद्यार्थ्यांची चिकाटी, शिक्षकांचे मार्गदर्शन व कॉलेजच्या प्राचार्या सौ. कार्तिश्वरी मॅडम यांनी वेळोवेळी घेतलेल्या बहुमोल परिश्रम विद्यार्थ्यांच्या कामी आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या सौ. कार्तिश्वरी मॅडम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विज्ञान विभाग
प्रथम क्रमांक – कु. प्रज्ञा जीवन कुलकर्णी 90%
द्वितीय क्रमांक – कु. श्रावणी राम कुराडे 83.67%
तृतीय क्रमांक – कु. समृद्धी नवनाथ नागणे 82.83 %
चतुर्थ क्रमांक – चि. इंद्रजीत किरण माळी 81.17%
पाचवा क्रमांक – कु. गीतांजली गजानन नलवडे 79.83%

वाणिज्य विभाग इंग्लिश मीडियम
प्रथम क्रमांक – कु. माही राजेंद्र बजाज 87.67 %
द्वितीय क्रमांक – चि. तनिष सफल गांधी 82. 17 %
तृतीय क्रमांक – कु. आकांक्षा विवेकराज साळुंखे 81.50%
चतुर्थ क्रमांक – चि. केतन विनोद जाधव 78.67%
पाचवा क्रमांक – कु. प्रणिता तात्यासाहेब नलावडे 78.00 %.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button