औरंगाबाद खंडपीठाने ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका फेटाळली
थेट जनतेतील सरपंच यांना दोन वेळा मतदान करण्याचा परिपत्रकानुसार अधिकार
औरंगाबाद ( बारामती झटका )
थेट जनतेतील सरपंच यांना उपसरपंच निवडीसाठी दोन वेळा मतदानाचा अधिकार ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्या आहेत.
ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या.
उपसरपंच निवडीसाठी सरपंचाला दोन वेळा मतदान करण्याच्या अधिकारा विरुद्धच्या याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्या आहेत. उपसरपंचाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत व समसमान मते मिळाल्यास निर्णायक मत म्हणून एक मत देण्याचा सरपंचाला अधिकार देण्याबाबत ग्रामविकास मंत्रालयाने दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी परिपत्रक काढले होते.

ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर मंगळवारी सुनावणी करताना या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे उपसरपंच निवडीच्या वेळी संख्याबळ कमी असणाऱ्या सरपंचाच्या पार्टीला बळ मिळून विरोधी गटाच्या सदस्यांची संख्या जास्त असून सुद्धा दोन मतामुळे अनेक ग्रामपंचायतीची गणिते बिघडणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng