कचरेवाडी येथील कै. पारूबाई कचरे अनंतात विलीन, शुक्रवारी रक्षाविसर्जन (तिसऱ्याचा) कार्यक्रम.
मुंबई मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव गणेश कचरे यांना मातृषोक…
कचरेवाडी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील कचरेवाडी गावातील कै. पारूबाई संदिपान कचरे यांचे बुधवार दि. ८ मार्च २०२३ रोजी सकाळी ६ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, दीर, जावा, पुतणे नातवंडे असा परिवार आहे.
मुंबई मंत्रालयाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव गणेश संदीपान कचरे यांच्या त्या मातोश्री होत्या. सांप्रदायिक असल्यामुळे वारकरी मंडळींनी हरिनामाच्या जयघोष व टाळाच्या गजरात अंत्ययात्रा निघालेली होती. त्यांच्यावर अंतिम संस्कार त्याच दिवशी दुपारी माळशिरस-कचरेवाडी रोडवरील राहत्या घराच्या शेजारी शेतामध्ये श्री. बाजीराव व श्री. गणेश या दोन्ही मुलांनी मुखाग्नी देऊन केलेले आहेत.
त्यांचा सुसंस्कृत स्वभाव असून त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. सर्वांमध्ये मिळून मिसळून नेहमी वागत असत. काही दिवसापूर्वी पती संदिपान कचरे यांना पक्षवायू झालेला होता. त्यांची सेवा केलेली असल्याने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाच्या पूर्वसंध्येला सौभाग्य मरण येऊन अनंतामध्ये विलीन झालेल्या आहेत.
शुक्रवारी दि. १०/०३/२०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता रक्षाविसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng