Uncategorizedताज्या बातम्या

करमाळा येथे स्वातंत्र्यसैनिक साथी मनोहर पंत चिवटे यांची पुण्यतिथी साजरी

करमाळा (बारामती झटका)

करमाळा नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक साथी मनोहरपंत चिवटे यांची ४१ वी पुण्यतिथी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक मनोहर चिवटे दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पंचवीस वर्षे पत्रकार म्हणून काम पाहत होते. नागरिक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून नगरपालिका निवडणुकीत १९५२ थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. गोवा मुक्ती स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. तसेच संयुक्त महाराष्ट्र लढा चळवळीत त्यांचा सक्रिय सहभागही होता. स्वातंत्र लढ्यात त्यांना सहा महिने जेल भोगावे लागली होती.

१९५१ साली देशात प्रथम निवडणुका झाल्या. यावेळी झालेल्या बॉम्बे विधानसभा १५४ करमाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी प्रजा समाजवादी पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ढाल चिन्हावर चिवटे यांना २७०१ मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कैलासवासी नामदेवराव जगताप यांना ९१४३ मते मिळाली होती. तर, शेतकरी कामगार पक्षाचे गणपती एकनाथ पाटील यांना ५२९० मते मिळाली होती. या पहिल्या निवडणुकीत स्वर्गीय नामदेव जगताप ३८५३ मतांनी विजयी झाले होते.मांगी तलावाच्या भूमिपूजनासाठी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू करमाळ्यात आल्यानंतर त्यांचे प्रथम स्वागत नगराध्यक्ष म्हणून मनोहर चिवटे यांनी केले होते.

स्वातंत्र्यसैनिक साथी मनोहर पंत चिवटे यांच्या पुण्यतिथीवेळी पत्रकार नासिर कबीर, दिनेश मडके, काय सांगता चे संपादक अशोक मुरूमकर यांची भाषणे झाली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button