कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आ. राम सातपुते यांची लोकप्रियता वाढवली.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील निरा-देवधर कार्यक्षेत्राबाहेरील दुष्काळी गावांच्या अपेक्षा उंचावल्या
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील कायम दुष्काळी असणाऱ्या गावांसाठी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये झाला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वसामान्य व शेतकरी यांचे जीवनमान उंचावणारा अनेक वर्षापासून रखडलेला निरा-देवधर प्रकल्पातील कॅनॉलचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या अधिवेशनातील लक्षवेधी प्रश्न निवेदनाची व सततच्या पाठपुराव्याची दखल घेतली आहे.
मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक विकासकामांबरोबर निरा-देवधर प्रकल्पातील कॅनॉल व फलटण-पंढरपूर रेल्वे अशा अनेक कामांच्या मागणीची दखल घेऊन आढावा बैठकीत मंजूर केलेले प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री यांनी दोन्ही जिव्हाळ्याचे प्रश्न मंजूर करून घेतलेले असल्याने कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी माढा लोकसभेचे कार्यतत्पर खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची सर्वसामान्य जनतेत व मतदारांमध्ये लोकप्रियता वाढवलेली आहे. निरा-देवधर प्रकल्पातील रखडलेल्या कॅनॉलसाठी सुप्रमा देऊन भरघोस निधीची पूर्तता केलेली असल्याने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील निरा-देवधर कार्यक्षेत्राबाहेरील दुष्काळी गावांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
निरा-देवधर प्रकल्पातील रखडलेल्या कॅनॉलचा प्रश्न मार्गी लागणार आहे. इस्राईल टेक्नॉलॉजीप्रमाणे बंद पाईपलाईन मधून पाणी तालुक्यातील गावांना येणार आहे. त्यामुळे बाष्पीभवन व लॉसेस कमी होणार असून एक टीएमसी पाणी वाढणार आहे. मूळ निरा-देवधर प्रकल्पातील गावांसह उर्वरित गावे अशी मिळून 22 गावांसाठी पाणी मिळणार आहे तरीसुद्धा माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना पाणी मिळण्याकरता गावाच्या हद्दीतील ओढे, नाले, बंधारे, तलाव भरून घेतल्यानंतर परकुलेशनचा फायदा आसपासच्या शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. राम सातपुते यांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त कोठा माळशिरस तालुक्यासाठी मंजूर करावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. राम सातपुते यांचा माळशिरस तालुक्यामध्ये एक गुंठा सुध्दा पाण्याने शेती विकणार नाही. सर्व काही माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी व जनता यांच्यासाठी केलेले कार्य आहे. मतदारांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून खासदार व आमदार यांना भरघोस मताधिक्याने विजय केलेले होते. दिलेल्या मतदानाचे सार्थक झाले असल्याची भावना मतदारांमधून बोलली जात आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात निरा-देवधर प्रकल्प व माळशिरस तालुक्याच्या संपूर्ण विकासाला व दळणवळणाला चालना देणारा फलटण-पंढरपूर रेल्वे या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, fantastic blog layout! How long have you ever been blogging for?
you made running a blog look easy. The overall
glance of your web site is fantastic, as neatly as the content!
You can see similar here sklep online