अकलूज येथे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंतीचे आयोजन
सोलापूर जिल्हा परीट समाजाचा भव्य मेळावा संपन्न होणार
अकलूज (बारामती झटका)
कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या १४७ व्या जयंतीचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परीट समाजाचा भव्य मेळावा शनिवार दि. १८/२/२०२३ रोजी सकाळी ९ वा. राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज सांस्कृतिक भवन, राऊत नगर अकलूज, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती नामदेव (नाना) वाघमारे मार्गदर्शक सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा परीट समाज सेवा मंडळ व माळशिरस तालुका परीट समाज सेवा मंडळाचे विरेंद्र पोपट वाघमारे यांनी दिली आहे.
या भव्य मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र शेठ आहेर रा. ने. अ. भा. धो. महा. संघ, राजेंद्र खैरनार प्रदेश अध्यक्ष म. प. धो. स. सेवा मंडळ, दयानंद गोरे साहेब मुख्य अधिकारी अकलूज नगरपरिषद, विजयकुमार परीट गटविकास अधिकारी इंदापूर, विजय भोसले, एकनाथ बोरसे वरिष्ठ उपाध्यक्ष अ.भा.धो.महा.संघ., तुषार रंधे जिल्हा परिषद अध्यक्ष धुळे, सौ. सीमाताई रंधे म.प्र.अ.म.प.धो.स. सेवा मंडळ, सुधीर खैरनार नाशिक, सौ. सुषमाताई अमृतकर का.म.प.धो.स सेवा मंडळ, रवी राऊत युवा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, शरद नाना पवार पुणे जिल्हाध्यक्ष, राजाभाऊ कदम नगरसेवक पुणे मनपा, के. आर. राऊत सर प्राध्यापक पिंपळनेर धुळे, संजय जगताप प्रदेश उपाध्यक्ष कोपरगाव, बळवंत साळुंखे ज्येष्ठ मार्गदर्शक महाबळेश्वर, सौ. विद्याताई सरसे अकोला, व्यंकट मारुतीराव वाघमारे माजी नगरसेवक लातूर, सौ. सुवर्णा सावर्डे प्रदेश उपाध्यक्ष पुणे, सदाशिव ठाकरे प्रदेश उपाध्यक्ष शिरपूर धुळे, आत्माराम चव्हाण साहेब नाशिक, अनिल साळुंखे जिल्हा उपाध्यक्ष (विटा) सांगली, अजय नवनाथ सोनटक्के अध्यक्ष सोलापूर जिल्हा, अनिल हुपरीकर पुणे, सोमनाथ गायकवाड प्रवक्ते पंढरपूर आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.
दि. १८/२/२०२३ रोजी सकाळी ८ ते १० मिरवणूक, सकाळी १० ते १०.३० राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या चौकातील फलकाचे अनावरण, सकाळी ११ वा. समाधी पूजन, सकाळी ११ ते १ सोलापूर जिल्हा मेळावा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद असा कार्यक्रम असणार आहे. तरी परीट समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng