काय सांगताय ! चक्क सोळा गुन्हे नोंद असणाऱ्या गुन्हेगाराची स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्ती…..
सराईत गुन्हेगार रतनसिंग राजपूत यांची बेकायदेशीरपणे सदस्य म्हणून नेमणूक केल्याबाबत रावसाहेब सावंत पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाळुंग (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतमध्ये वेगवेगळे सोळा गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार रतनसिंह राजपूत यांची चक्क स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आलेली असल्याने खळबळ उडालेली आहे.
महाळुंग ता. माळशिरस येथील रावसाहेब चांगदेव सावंत पाटील यांनी महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीमध्ये सराईत गुन्हेगार असलेले रतनसिंग नामदेव राजपूत यांची बेकायदेशीरपणे नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक केल्याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब व सहआयुक्त नगर प्रशासन विभाग सोलापूर यांना निवेदन दिले आहे.
सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, माझी पत्नी महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीमधील निर्वाचित विद्यमान नगरसेवक आहे. सन २०२३ च्या मे महिन्यात नामनिर्देशन सदस्य पदाच्या निवडीसाठी नगरपंचायतीची विशेष सभा बोलवण्यात आलेली होती. सदर पदासाठी एकूण दोन फॉर्म भरण्यात आले होते. त्यापैकी रतनसिंग नामदेव रजपूत यांची पात्रता नसताना देखील फॉर्म स्वीकारण्यात आला. सदरचा नामनिर्देशन फॉर्म हा कायद्यातील तरतुदीप्रमाणे नव्हता. सदर फॉर्ममध्ये उमेदवाराच्या पात्रतेबाबत कोणतीही माहिती भरलेली नाही. रतनसिंग नामदेव रजपूत यांच्यावर गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यांमध्ये शिक्षा देखील लागलेली आहे.
काही गुन्हे प्रलंबित असताना व काही गुन्ह्यांमध्ये मे. कोर्टाने शिक्षा झाली असताना रतनसिंग नामदेव रजपूत यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक करणे चुकीचे व बेकायदेशीर आहे. सदरचे गुन्हे बेकायदेशीर वेश्या व्यवसाय आणि दारू व मटका व्यवसाय याबाबतचे आहेत. सध्या दारू, मटका, वेश्या व्यवसाय राजरोसपणे चालू आहेत. रतनसिंग नामदेव राजपूत यांनी महाळुंग श्रीपुर नगरपंचायत हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्य केले नाही. तसेच सध्या ते कोणत्याही सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेतील सदस्य नाहीत. या सर्व कागदपत्रांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पडताळणी करणे अत्यंत गरजेचे होते. तथापि, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्याही स्वरूपाची पडताळणी केलेली नाही. तसेच पिटासीन अधिकारी यांनी देखील पडताळणी केलेली नाही. नामनिर्देशन पत्रातील कायदेशीर फॉर्म सदर प्रोसिडिंगमध्ये दाखल नाहीत. तसेच सामाजिक कार्य अथवा संस्थेतील वैध कागदपत्रेही दाखल नाहीत. सदरची प्रक्रिया ही पूर्णपणे पक्षपातीपणाची व बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीमध्ये त्वरित त्यांच्यावर कार्यवाही होणे आणि रतनसिंग नामदेव राजपूत यांना नामनिर्देशित सदस्य पदावरून काढून टाकणे कायद्याने गरजेचे आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This article was a fantastic blend of information and insight. It really got me thinking. Let’s dive deeper into this topic. Click on my nickname for more thought-provoking content!