Uncategorizedताज्या बातम्या

कारूंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड

कारूंडे ( बारामती झटका )

कारूंडे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर सूर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच सौ. बहिणाबाई रघुनाथ रुपनवर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक माळशिरस पंचायत समिती कार्यालयातील श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास गायकवाड, सचिन वाघमोडे, सागर सूर्यवंशी, सविता भारत नामदास, सुरेखा सोमनाथ रुपनवर, सविता दिलीप शिंदे, आदी सदस्य उपस्थित होते. श्री. सागर सदाशिव सूर्यवंशी यांचा एकमेव उपसरपंच पदासाठी अर्ज आलेला असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री‌. जाधव यांनी बिनविरोध उपसरपंच पदी सागर सूर्यवंशी यांच्या निवडीची घोषणा केली. ग्रामविकास अधिकारी मोरे भाऊसाहेब यांनी सहकार्य केले.

सदरच्या निवडीनंतर माजी सरपंच श्री. हनुमंतराव पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन श्री. सुभाषराव पाटील, विद्यमान चेअरमन श्री. सूर्यकांत पाटील, युवा नेते अमोल पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव रुपनवर, माजी उपसरपंच महादेव रुपनवर यांनी बिनविरोध उपसरपंच सागर सूर्यवंशी यांना भावी कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीचे संचालक सचिन शिंदे, तानाजी पाटोळे, माऊली गायकवाड, भारत रामदास यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सदर निवडीवेळी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर पवार साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

उपसरपंच पदी निवडीची घोषणा केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. वाजत गाजत ग्रामदैवत भैरवनाथाच्या दर्शनासाठी सर्वजण रवाना झाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort