केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सन्मान केला.
इंदापूर ( बारामती झटका )
भारत देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचा इंदापूर येथे माढा लोकसभेचे माजी खासदार व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी सन्मान केला. यावेळी राज्यसभेचे माजी खासदार व विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज नगरीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टीच्या “लोकसभा प्रवास योजना” अंतर्गत बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर विधानसभा मतदार संघात दौऱ्यानिमित्त केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आलेल्या होत्या. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीत माढा लोकसभेचे माजी खासदार व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व परिवारातील सदस्य यांनी आवर्जून भेट घेऊन सन्मान केला.
यावेळी भविष्य काळातील भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीविषयी चर्चा करण्यात आली. राजकारणात बुजुर्ग व्यक्तिमत्व असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या सन्मानाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन भारावून गेलेल्या होत्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
