कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी नातेपुते नगरपंचायत सज्ज…
नातेपुते (बारामती झटका)
श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दि. 4 जुलै 2022 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होत असुन पहिला मुक्काम नातेपुते येथे आहे. आगमनाच्या निमित्ताने नातेपुते नगरपंचायतीच्यावतीने सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचेसह नगराध्यक्षा सौ. उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमुख, सार्वजनिक बांधकाम सभापती अतुल पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती स्वाती बावकर, महिला व बालकल्याण सभापती संगीता काळे यांच्यासह सर्व नगरसेवक पालखी सोहळा व्यवस्थापन जबाबदारी सांभाळत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने खालील प्रमाणे कामे पुर्ण झाली आहेत.
पालखी तळ
पालखी तळावर पुर्व व पश्चिम बाजुच्या झाडी काढण्याचे काम केले आहे. फरांडीने लेवल केली असुन सर्व कचरा उचलुन झाला आहे. तळालगत दिंड्यांच्या जागातील स्वच्छता करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तळालगत असणा-या वाडयावस्त्या येथील दिंड्या उतरणाऱ्या जागेवर स्वच्छता व झाडी तोडणेचे काम पुर्ण झाले आहे.
रस्ते दुरुस्ती
पालखी तळाकडे जाणा-या रस्त्याची व दिंड्या जाणा-या गावातील रस्त्याची दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे खड्डे बुजवणे, अनावश्यक माती उचलणे इ. कामे तसेच रस्त्यांच्या बाजुची वाहतुकीला आडव्या येणा-या झाडांच्या फांद्या काढणेचे काम केलेले आहे.
पाणी पुरवठा
पालखी तळ व संपुर्ण शहरातील पाणी पुरवठा पाईप लिकेज काढणे, जल शुद्धीकरण केंद्रावरील टाक्या स्वच्छ करणे. पालखी तळावर जादा नळ कोंड्याळ्याची व्यवस्था करणे. इ. कामे पूर्ण झाली आहेत. वारकऱ्यांना टँकर भरण्यासाठी दावडा विहीर, मेहता विहीर, कावडीबुवा बोअर, बुचडे, जगताप विहीर ही ठिकाणे असुन दावडा विहीर या ठिकाणी रस्त्यावर मुरूम टाकून झालेला आहे. तसेच यावर्षी दहिगाव रस्ता अविनाश दोशी यांच्या विहीरीवर देखील टँकर भरण्याची व्यवस्था केलेली आहे.
मुरुमीकरण
पालखी तळाकडे जाणा-या सर्व मार्गावर गरजेप्रमाणे मुरुम टाकून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आलेले आहेत.
शहर स्वच्छता
नगरपंचायतीच्या सफाई कामगारांकडुन पालखी तळासह परिसर व शहारातील सर्व भागात स्वच्छता करण्यासाठी दैनंदीन कामासह इतर जादा भागात सुरुवात करण्यात आली आहे. तसेच नाले सफाई पूर्ण झालेली आहे.
अतिक्रमण
पालखी मार्ग व इतर सर्व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढुन झालेली आहेत.
शौचालय
पालखी तळावरील व शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी फिरते शौचालये बसविण्यात येणार आहेत. एकुण १४ ठिकाणी १००० शौचालय बसवण्यात येणार आहेत. तसेच नगरपंचायतीचे ६० शौचालय सुस्थितीत करण्यात आलेले आहेत.
मनुष्य बळ
यासाठी एकुण मनुष्यबळ कार्यालय – १४, आरोग्य – २६, पाणी पुरवठा – ९, विद्युत १ असे एकुण ५० कामगार कार्यरत आहेत.
फवारणी
पालखी आगमनापुर्वी व पालखी गेल्यावर तळावर व शहरात फवारणी करण्यात आलेली आहे.
विद्युतीकरण
पालखी तळावर शासनातर्फे बसविण्यात आलेल्या १० हायमास्टसह संपुर्ण शहर व वाड्यावस्त्यावर खांबांवर जादा लाईट लावण्याचे काम पुर्ण झाले आहे. सर्व डि.पी. दुरुस्ती महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीकडुन करुन घेण्यात आली आहे. तसेच जनरेटरची सोय करण्यात आलेली आहे.
नातेपुते नगरपंचायत जय्यत तयारी करून वारकरी व भाविक यांच्या स्वागत व सेवेसाठी सज्ज झालेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I enjoyed the humor in your piece! For further reading, check out: FIND OUT MORE. Let’s discuss!