कैवल्य साम्राज्य संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी वारी पालखी सोहळ्यातील दाम्पत्यांच्या सेवेने वारकरी व भाविकभक्त भारावून गेले.
तुझी सेवा करीन मनोभावे,
माझे मन गोविंदी रंगले,
नवसी ये नवसी ये माझे,
पंढरीचे दैवते विठ्ठल नवसीये,
बापरूकमा देवीवरू विठ्ठल,
चित्त चैतन्य चोरून नेले.
मांडवे (बारामती झटका)
कैवल्य साम्राज्य संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात होऊन नातेपुते येथे पालखी मुक्काम विसावला होता. शनिवार दि. 24 जून 2023 रोजी सकाळी पालखीचे प्रस्थान होऊन मांडवे ओढा येथे सकाळची न्याहारीसाठी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा विसावला जातो. 50 फाटा या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सौ. संस्कृतीताई राम सातपुते या दाम्पत्यांनी माऊलींच्या पायी वारी सोहळ्यातील वैष्णव वारकरी व भाविकभक्तांच्या हात, पायाची मालिश करून सेवा केलेली असल्याने वैष्णव वारकरी व भाविकभक्त भारावून गेलेले आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात भुकेलेल्या अन्न मिळते, तहानलेल्या पाणी मिळते, परंतु चालून दमून भागून गेलेल्या वैष्णवांना मायेचा हात देणारे कमी असतात. ‘जिथे कमी तिथे आम्ही’, या न्यायाने लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व धर्मपत्नी सौ. संस्कृतीताई सातपुते यांच्यासह कार्यकर्त्यांनी वैष्णवांची सेवा केलेली आहे.
सातपुते दाम्पत्यांच्या मनामध्ये वैष्णवांची सेवा करण्याची संकल्पना आलेली असल्याने
तुझी सेवा करीन मनोभावे,
माझे मन गोविंदी रंगले,
नवसी ये नवसी ये माझे,
पंढरीचे दैवते विठ्ठल नवसीये,
बापरूकमा देवीवरू विठ्ठल,
चित्त चैतन्य चोरून नेले.
या अभंगाचा प्रत्यय येत आहे.
वैष्णव वारकरी व भाविक भक्तांना माहित नाही, आपल्या हात व पायाला हात लागलेले माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार आहेत. समजल्यानंतर वैष्णव वारकरी व भाविक भक्तांच्या आशीर्वादाने माप ओलांडून वाहत होते.

संताचे सुख झाले या देवा,
म्हणऊनी सेवा करी त्यांची,
तेथे माझा काय कोण तो विचार,
वर्णावया पार महिमा त्याचा,
निर्गुण आकार झाला गुणवंत,
घाली दंडवत पुजोनिया,
तीर्थ त्यांची इच्छा करिती नित्यकाळ,
व्हावया निर्मळ आपणांसी,
अष्ट महासिद्धीचा कोण आला पाड,
वागो नेदी आड कोणी तया,
तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी,
राहिले चरणी निकटवासे…
अशा अनेक अभंगांचे वैष्णव वारकरी व भाविकांच्या तोंडून लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते व सौ. संस्कृतीताई सातपुते यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले जात होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng