Uncategorizedताज्या बातम्या

कै. शुभदा देशपांडे यांचे अल्पशा आजाराने निधन

उस्मानाबाद (बारामती झटका)

कै. शुभदा शाहूराज देशपांडे यांचे अल्पशा आजाराने दि. २६/०६/२०२२ रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. देशपांडे आणि देशमुख परिवाराचा आधारवड हरपल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कै. शुभदा देशपांडे यांचा जन्म दि‌. २१ ऑक्टोबर १९५२ रोजी केशर जवळगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद येथे झाला होता. त्यांचा विवाह शाहूराज (गोविंद) भगवंत देशपांडे खडकी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांच्याशी झाला होता. ते सामाजिक कार्यकर्ते असून अनेक वर्ष खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी कार्यरत होते. त्यांना पद्मजा, दिपाली आणि शुभांगी या तीन मुली आहेत. तीनही मुली उच्चशिक्षित आहेत. सौ. पद्मजा सचिन मोटे या एमडी स्त्रीरोगतज्ञ असून त्यांचे पती डॉक्टर आहेत. सौ. दिपाली अमित द्रविड व त्यांचे पती दोघेही इंजिनियर आहेत. सौ. शुभांगी संतोष चेलटे व त्यांचे पती दोघेही इंजिनियर आहेत.

कै. शुभदा देशपांडे यांनी देशपांडे आणि देशमुख परिवाराच्या प्रगतीसाठी खूप कष्ट घेतले. मुलींच्या शिक्षणासह कुटुंबाच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असून त्यांनी माणसे जोडली आहेत. खडकी येथील सर्व ग्रामस्थांवर त्यांचे विशेष प्रेम होते. २०१९ मध्ये कोरोनाच्या गंभीर आजारातून त्यांचा पुनर्जन्म झाला होता. पण, गेली सहा महिने त्या आजारीच होत्या. त्यांच्या तीनही मुलींनी त्यांची सेवा केली आहे.

देशमुख आणि देशपांडे परिवारावर शोककळा पसरल्याने ईश्वर त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी बळ देवो. कै. शुभदा देशपांडे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!!!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button