क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्वसामान्य व गोरगरीबांसाठी शिक्षणाची दारे खुली केल्यामुळे आजच्या मुलींची शिक्षण क्षेत्रात उंच भरारी – सौ. शितलदेवी मोहिते पाटील
अकलूज (बारामती झटका)
माळेवाडी अकलूज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे 192 वी जयंती ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डाॅटर्स माॅम्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. फुले निवास येथे सोलापूर जि. प. माजी सदस्या सौ. सुनंदाताई फुले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सौ. शितलदेवी मोहिते पाटील पुढे म्हणाले की, अठराव्या शतकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानाची गंगा सर्व सामान्य गोरगरीबांच्या घराघरात पोहचवली. स्त्रीयांना शिक्षणाची दारे खुली केली. चूल आणि मूल या समाजातील संकल्पनेला विरोध पत्करून मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्याचाच परिणाम आज २१ व्या शतकात मुली सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून स्वकर्तृत्वान बनल्या आहेत.

या बहारदार कार्यक्रमात बोरगांव येथील सुप्रसिध्द बासरी वादक प्रविण साठे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच यावेळी लहान मुलांची भाषणे, आरोग्य विषयक महिलांना माहिती, ओवी, गवळण, गायन अधिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई, राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2022 प्राप्त झाल्याबद्दल सौ. ललीतागौरी राणे, सौ. प्रतिभा गोडसे यांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सुलभा फुले, रतन अनंत कवळस, राणी एकतपुरे, प्रतीक्षा एकतपुरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस, जिल्हा परिषद आरोग्य विभाग केंद्राचे डॉक्टर, सिस्टर, आशा वर्कर तसेच तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या सिस्टर सुरेखा केदारे, तनुजा केंजळे, सुनिता भालेराव यांचे विशेष सहकार्य मिळाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब एकतपुरे, भारतीय ओबीसी मोर्चा सेलचे तालुकाध्यक्ष शंकरराव काकुळे, प्राध्यापक बलभीम काकुळे, डॉ. पांडूरंग नलवडे उपस्थित होते. तर या कार्यक्रमास माळेवाडी परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी नितीन कुदळे, राजीव बनकर, बाळासाहेब फुले, बाळासाहेब एकतपुरे, समाधान देशमुख, रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, मनोहर एकतपुरे, कांतीलाल एकतपुरे यांचे विशेष मार्गदर्शन व परिश्रम
लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनंदाताई फुले यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ. प्रतिभा गोडसे व सौ. ललितागौरी राणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मृणालिनी फुले यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng