Uncategorized

खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी नितीनराजे निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली..

शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे.

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सरकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल सुरू असलेल्या शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी सवतगव्हाणचे माजी सरपंच नितीनराजे रावसाहेब निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड अकलूज या संस्थेची स्थापनेपासून बिनविरोध संचालक मंडळ व चेअरमन निवडीची परंपरा कायम राखलेली आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणूक सोसायटी मतदार संघातून श्री. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, श्री. अजितसिंह माधवराव माने देशमुख, श्री. मधुकर अगतराव तरंगे, श्री. मच्छिंद्र जनार्दन व्हरगर, व्यक्तिगत मतदार संघातून श्री. रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील, श्री. नितीन रावसाहेब निंबाळकर, श्री. हनुमंत महादेव सोनलकर, श्री. हनुमंत कृष्णा शिंदे तर महिला प्रतिनिधी मतदार संघात सौ. विमल हनुमंतराव माने, सौ. सुनंदा दत्तात्रेय रिसोडकर, अनुसूचित जाती व जमाती मतदार संघात श्री. प्रमोद नंदकुमार रास्ते, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात श्री. अनिल रामचंद्र वाघमोडे, इतर मागासवर्ग मतदार संघात श्री. लक्ष्मण तुकाराम गोरे असे नवनियुक्त संचालक मंडळ बिनविरोध झालेले होते.

माळशिरस तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ अकलूज या संस्थेच्या चेअरमनपदी पूर्व भागाचे नेते श्री. नितीनराजे रावसाहेब निंबाळकर तर व्हाईस चेअरमन पदी श्री‌. हनुमंत महादेव सोनलकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. नितीनराजे निंबाळकर यांनी सवतगव्हाण गावचे तीन वेळा सरपंच पदाचे काम केलेले असून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, शंकरनगर या कारखान्यावर निमंत्रित संचालक म्हणून काम केलेले आहे. नितीनराजे निंबाळकर माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात मोहिते पाटील गटाचे प्रमुख युवा नेते म्हणून काम करत असतात. खरेदी विक्री संघाचे प्रभारी चेअरमन म्हणून गेल्या दहा महिन्यांमध्ये त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन पुन्हा चेअरमन पदी निवड केलेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील, आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खरेदी विक्री संघाची निवड करण्यात आलेली आहे. चेअरमन पदी निवड झाल्यानंतर नितीनराजे निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटील, स्वर्गीय रावसाहेब पाटील बोरगाव, अजितसिंह जहागीरदार पिलीव, माजी आमदार चांगोजीराव देशमुख, माजी सभापती मोहनराव पाटील यांच्यासारख्या थोर नेत्यांनी संघाच्या चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेली आहे. अशा प्रतिष्ठित असणाऱ्या संस्थेच्या चेअरमन पदी काम करण्याची संधी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यास विजयदादा बाळदादा, रणजीतदादा यांनी दिलेली असल्याने नेत्यांचा विश्वास व सभासदांचे हित लक्षात घेऊन भविष्यात कारभार करणार असल्याचे नवनियुक्त बिनविरोध चेअरमन नितीनराजे निंबाळकर यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button